ई-कॉमर्स व्यवसायात विदेशी कंपन्यांचे कायद्याचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:09+5:302021-09-25T04:09:09+5:30
नागपूर : देशातील ई-कॉमर्स व्यवसायात विदेशी कंपन्या कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. ॲमेझॉन कंपनीने भारतात वकिलांच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांना लाख ...

ई-कॉमर्स व्यवसायात विदेशी कंपन्यांचे कायद्याचे उल्लंघन
नागपूर : देशातील ई-कॉमर्स व्यवसायात विदेशी कंपन्या कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. ॲमेझॉन कंपनीने भारतात वकिलांच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांना लाख दिल्याच्या आरोपाच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रकाशित होत असल्याचा मुद्दा पुढे करून कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) आव्हानार्थ नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी ई-कॉमर्सचे नियम त्वरित लागू करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी विमला आर. यांना सोपविले. लाच दिल्याच्या आरोपाची सीबीआयतर्फे चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हे निवेदन सरकारला पाठविण्यात येणार आहे.
चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, लाच दिल्याच्या आरोपात सरकारकडे सादर केलेल्या ॲमेझॉनच्या वित्तीय कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे. त्यातून लाच दिली वा नाही, हे सत्य बाहेर येईल. जर सत्य असेल तर अधिकारी आणि अन्य लोकांवर कठोर कारवाई करून नावे सार्वजनिक करावी. चेंबरचे माजी अध्यक्ष व कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, ॲमेझॉनने देशातील सर्व कायदे व नियमांचे उल्लंघन केले आहे. हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे ॲमेझॉनचे व्यापार मॉडेल आणि सर्व विभागाची तपासणी करावी. याकरिता आयकर व केंद्र आणि राज्याचा जीएसटी विभाग, सीसीआय, प्रवर्तन संचालनालय, सेबी आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर विभागाने समन्वय समिती बनवावी. त्यामुळे सर्व प्रकरण पुढे येईल.