विनायक पाणूरकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:07+5:302021-05-24T04:08:07+5:30
नागपूर : विनायक वासुदेवराव पाणूरकर (८०, रा. म्हाळगीनगर) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी सकाळी ...

विनायक पाणूरकर यांचे निधन
नागपूर : विनायक वासुदेवराव पाणूरकर (८०, रा. म्हाळगीनगर) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे आहेत.
वंदना ढाेणे
बुद्ध विहार समन्वय समितीच्या सदस्य वंदना राजेंद्र ढोणे (५०, रा. स्वरूपनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी व दाेन मुले आहेत.
दीपक राऊत
दीपक अजाबराव राऊत (५८, रा. ठवरे काॅलनी) यांचे निधन झाले. साेमवारी सकाळी ११ वाजता वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
पुंडलिक धर्मेजवार
ज्योतिषशास्त्रातील कृष्णमूर्ती पद्धतीचे गाढे अभ्यासक पुंडलिक धर्मेजवार (७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दाेन मुली आहेत.
नागाेराव दातीर
नागाेराव बाळकृष्ण दातीर (८९, रा. मानेवाडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शारदा पांडे
शारदा पांडे (८७, रा. रामदासपेठ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, तीन मुली व नातवंडे आहेत.
बळीराम भांडारकर
बळीराम नारायणराव भांडारकर (५९, रा. दक्षिणामूर्ती चाैक, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व भाऊ आहेत.
कृष्णा झाडे
कृष्णा तुकाराम झाडे (५९, रा. उमरेड) यांचे निधन झाले. ते महावितरणमध्ये तंत्रज्ञ होते. उमरेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दाेन मुले आहेत.
वासुदेवराव केचे
वासुदेवराव महादेवराव केचे (७२, रा. रुक्मिणीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व नातवंडे आहेत.
सुजाता लामसाेंगे
सुजाता सुरेश लामसाेंगे (रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व दाेन मुली आहेत.
एकनाथ उपासनी
एकनाथ (बाळ) रघुनाथ उपासनी (९३, रा. खरे टाउन, धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.
नंदा लांडे
नंदा विलासराव लांडे (५५, रा. ताजनगर, मानेवाडा राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.