पाली भाषेचे गाढे अभ्यासक विमलकीर्ती यांचे निधन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:12+5:302020-12-15T04:26:12+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली - प्राकृत विभागाचे माजी विभागप्रमुख, पाली भाषेचे गाढे अभ्यासक, बाैद्ध साहित्याचे ...

पाली भाषेचे गाढे अभ्यासक विमलकीर्ती यांचे निधन ()
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली - प्राकृत विभागाचे माजी विभागप्रमुख, पाली भाषेचे गाढे अभ्यासक, बाैद्ध साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, पाली शब्दकाेषकार - कुशल अनुवादक, मराठी आणि हिंदी भाषेतील लेखक, आंबेडकरी - बाैद्ध चळवळीतील लढवय्या विचारवंत डॉ. विमलकीर्ती (एल.जी. मेश्राम) यांचे साेमवारी कोरोनाने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, नातवंड व मोठा आप्त परिवार आहे.
डॉ. विमलकीर्ती यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील देवरीदेव या गावी ५ फेब्रुवारी १९४९ साली झाला. डॉ. विमलकीर्ती हे जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्खू डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या संपर्कात आले. ते अनेक वर्षे त्यांच्या सहवासात राहिले. त्यांच्याच हस्ते १९७१ साली त्यांनी उपसंपदा घेतली होती. विमलकीर्ती यांनी भदन्त आनंद कौसल्यायन यांचे बहुतेक साहित्य प्रकाशित केले. संपूर्ण त्रिपीटकाला मराठी व मराठीत आणून ते लोकांसमोर आणण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांनी आतापर्यंत पाली, हिंदी व मराठीत जवळपास ८१ च्या वर पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत.