शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

नागपूर लगतची गावे पुरात, पुरात अडकलेल्या ५० लाेकांना रेस्क्यू करण्यात यश

By निशांत वानखेडे | Updated: July 9, 2025 17:38 IST

Nagpur : धुवांधार पावसाचे थैमान, तिसऱ्या दिवशीही संततधार

नागपूर : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेली जिल्ह्यात पावसाची संततधार तिसऱ्या दिवशी अधिकच तीव्र झाली. मंगळवारी रात्रीपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून या जिल्ह्यातील अनेक गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. नागपूर शहर व शहरालगतच्या वस्त्या पुराने वेढल्या गेल्या. पुरात अडकलेल्या ५० च्यावर लाेकांना रेस्क्यू करण्यात आले. गडचिराेली, भंडारा, गाेंदियातही पुराने वेढलेल्या अनेक गावांचा संपर्कच तुटलाही आहे.

पूर्व विदर्भात सतत तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा जाेर तिसऱ्या दिवशी अधिकच वाढला व आकाशातून धाे-धाे सरी बरसल्या. नागपूरला बुधवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत १२ तासात तब्बल २०२.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. सकाळपासूनही पावसाच्या सरी सुरुच हाेत्या. या धुवांधार पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या पाेहरा नदी, पिवळी नदीचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले. पाेहरा नदीलगत नरसाळा, बेसा व पिपळा गावाला पुराने वेढा घातला. लाेकांची घरे पाण्याखाली आली हाेती. नरसाळा गावात पुरात फसलेल्या २१ लाेकांना एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. रात्री २ वाजतापासून सकाळी १० वाजतापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन चालले हाेते. पावनगाव येथील १४ लाेकांना पुरातून बाहेर काढण्यात आले. पूर्व नागपूरची पुराने फुगलेल्या पिवळी नदीच्या काठावरील नवकन्यानगरमधील १४ लाेकांना पुरातून सुखरूप काढण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने धुवांधार बॅटिंग केली. उमरेड तालुक्यात सकाळपर्यंत विक्रमी २८४.२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. ज्यामुळे शेतातील अंकूर फुटलेले धान्य पाण्याखाली बुडाले आहे.भंडारा, गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यातही पावसाने तिसऱ्या दिवशीही थैमान घातले. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदी दुथडी वाहत असून लगतचा परिसर पाण्याखाली आला आहे. भंडारा शहरातील काही वस्त्या जलमय झाल्या. भंडारा शहरात सकाळपर्यंत १४४ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. जिल्ह्यात लाखांदूर परिसरात दुसऱ्या दिवशीही १६४.४ मि.मी. पाऊस झाला. पवनी व तुमसर तालुक्यातही पावसाचा तडाखा बसला आहे. गाेसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडल्याने तिकडे गडचिराेली जिल्ह्यात पाल नदीला पूर आला. देसाईगंज तालुक्यात दुसऱ्याही दिवशी पावसाचा तडाखा बसला. गाेंदिया जिल्ह्यातही तिसऱ्या दिवशी पावसाचा जाेर तीव्रतेने कायम हाेता. त्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून मार्ग जलमय झाल्याने २० पेक्षा जास्त मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. गडचिराेली जिल्ह्यातही अनेक गावे पाण्याने वेढली गेल्याने संपर्काबाहेर गेली आहेत. गडचिराेलीचाही नागपूरची संपर्क तुटला आहे.

बुधवारी सकाळपर्यंत या भागात विक्रमी पाऊस

  • उमरेड (जिल्हा नागपूर) : २८४.२ मि.मी.
  • नागपूर शहर : २०२.४ मि.मी.
  • लाखांदूर (जिल्हा भंडारा) : १६४.५ मि.मी.
  • भंडारा शहर : १४४ मि.मी.
  • चंद्रपूर जिल्हा : चिमुर १५१.४ मि.मी., ब्रम्हपुरी १३९.८ मि.मी.
  • सडक अर्जुनी (जिल्हा गाेंदिया) : १२०.६ मि.मी.
  • हिंगणघाट (जिल्हा वर्धा) : १२८ मि.मी., वर्धा शहर ८५.२ मि.मी.

 

 

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊसfloodपूर