शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ग्रामस्थांचा नागपूर जि.प.मध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:48 IST

काटोल तालुक्यातील मेटपांजरा जिल्हा परिषद क्षेत्रात येणारी जवळपास सर्वच गावे पाण्याअभावी त्रस्त झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांची रात्रदिवस भटकंती सुरू असताना शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी झोपेत असल्याने शुक्रवारी हे गावकरी हातात मडके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात धडकले.

ठळक मुद्देजि.प.सदस्य चिखले पाणी देत नसल्याचा आरोप : मडके फोडून व्यक्त केला रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल तालुक्यातील मेटपांजरा जिल्हा परिषद क्षेत्रात येणारी जवळपास सर्वच गावे पाण्याअभावी त्रस्त झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांची रात्रदिवस भटकंती सुरू असताना शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी झोपेत असल्याने शुक्रवारी हे गावकरी हातात मडके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात धडकले.काटोल तालुक्यातील मेंढेपठार (बाजार) येथील शेकडो ग्रामस्थांनी देशकर पवार यांच्या नेतृत्वात जि.प.मुख्यालय गाठले. येथे प्रशासनाविरोधात नारे निदर्शने करुन मडकी फोडून आपला रोष व्यक्त केला. ग्रामस्थांचे म्हणने होते की जि.प.माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी मेंढेपठार या गावामध्ये आपल्या स्वत:च्या शेतातील विहिरीचे पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण केले आहे. विहिरीला पाणी असताना देखील ते एक दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे. तसेच पाणी अधिग्रहण नियमानुसार पूर्णत: पिण्याचे पाणी देत नाही. ४-५ दिवसाआडही कधी कधी पाणी पुरवठा करतात. हे सर्व ते सूडबुध्दीने स्वत:च्या शेताचे ओलित केल्याशिवाय गावाला पाणी देत नाही. राजकीय रागापोटी ते गावातील नागरिकांना वेठीस धरीत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जि.प.अध्यक्षा निशा सावरकर यांच्याकडे सादर केले. सावरकर यांनी ग्रामस्थांचे ऐकून घेत तात्काळ गावामध्ये दोन टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे निर्देश ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व काटोल उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आंदोलनात देशकर पवार यांच्यासह अरुण शिरपूरकर, तुकाराम लोणारे, प्रमोद कोहळे, रत्ना क्षीरसागर, रंजना सरियाम, मनोज जामडे व शेकडो ग्रामस्थ होते.गावात पाणीटंचाई नाहीच - सरपंच चिखलेगावात पाण्याची समस्या नाहीच काही विरोधक तसा खोटा आव आणत आहे. मागील तीन महिन्यापासून चंद्रशेखर चिखले यांच्या स्वत:च्या खासगी विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करतअसुन गावाची लोकसंख्या ९७० असून ३० हजार लिटर पाण्याची टाकी दररोज भरून पाणी दिले जाते. काही विरोधक जाणीवपूर्वक टंचाई असल्याचा भास निर्माण करीत असून राजकीय व सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मेंढेपठारच्या सरपंच दुर्गा चिखले यांनी सांगितले.

टॅग्स :agitationआंदोलनNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरWaterपाणी