- जितेंद्र ढवळे, नागपूर'बुधवारी सकाळ उजाडली होती. नेहमीप्रमाणे 'दादांची' भेट घेऊन काही प्रश्न मांडायचे, काही मार्गदर्शन ऐकायचे, एवढाच हेतू होता. पण आजच्या सकाळी नियतीने वेगळाच डाव टाकला होता. मुंबईत दाखल होताच, बॅग रूमवर ठेवायची एवढी उसंतही न देता अजित पवार यांच्या निधनाची बातमी कानावर पडली. आणि मी स्तब्ध झालो,' हे सांगताना उमरेडच्या विलास झोडपेंचा स्वर अगदी गहिवरून गेला.
उमरेडच्या विलास झोडापेंची ओळख 'दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता' म्हणून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून झटणारे पक्षासाठी झोडापे, अजित पवारांचे कट्टर समर्थक होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी संकल्प घेतला. 'जोवर अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, तोवर मी डोक्यावरचे केस कापणार नाही.'
'तुझ्यासारखे कार्यकर्ते आमदार झाले पाहिजेत'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतरही झोडापे अजित पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. 'दादा माझे विठ्ठल' असे ते अभिमानाने सांगातात. 'विलास, तू डोक्यावरचे केस वाढविल्याने मी मुख्यमंत्री होणार नाही. लोकशाहीत मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागतं तुझ्यासारखे कार्यकर्ते आमदार झाले पाहिजेत केस वाढविल्याने तू बाई आहेस की माणूस, तेही कळणार नाही. तेलाचा खर्च वाढेल. त्यापेक्षा लोकांची कामं करा, पक्ष संघटना मोठी करा,' असाच रोखठोक, पण आपुलकीचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोडापे यांना दिला होता.
बुधवारी सकाळी ८.३० वाजता अजित पवार यांच्या भेटीसाठी विलास झोडापे मुंबईत दाखल झाले होते. रूमवर बॅग ठेवत नाही तोच दादांच्या निधनाची बातमी त्यांना समजली. सामान्य कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होणारा आपला नेता गेल्याची जाणीव होताच झोडापे कोसळले. स्वतःला सावरत ते अजित पवार यांच्या शेवटच्या दर्शनासाठी तत्काळ बारामतीकडे रवाना झाले. पत्नी आशा तसेच मुलं सत्यश्री व चैत्यश्री यांनाही त्यांनी बारामतीला बोलावून घेतले.
दोन महिन्यापूर्वी घेतली होती कुटुंबाची भेट
अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना विलास झोडापे भावुक झाले. २००३ मध्ये अजितदादांची पहिली भेट झाली. त्या वेळी त्यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी होती.माझे वडील गणेश झोडापे यांच्यासह २४ जण सिंचन विभागात अतिरिक्त ठरले होते. त्यांना काम मिळावे म्हणून दादांची भेट घेतली. त्यांनी सविस्तर माहिती घेत वडिलांना न्याय मिळवून दिला.त्या दिवसापासून माझ्या मनातील निष्ठा अधिक दृढ झाली, दोन महिन्यांपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही अजित पवार यांनी झोडापे आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ दिला होता. असे ते सांगतात.
दादांसाठी ठेवलेले केस त्यांनाच अर्पण
अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर गुलाबी ड्रेस कोड परिधान करून झोडापे कुटुंबीयांनी त्यांच्या कार्याला सलामी दिली होती. नागपूर अधिवेशनात उमरेड मतदारसंघातील चनोडो-हिवरी हिवरी येथे राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्याबाबत त्यांनी दादांना निवेदन दिले. तीच शेवटची भेट ठरली. आता दादा नाहीत. त्यांच्या स्मरणार्थ केस विसर्जन (मुंडण) करून त्यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे झोडापे यांनी सांगितले.
Web Summary : Ajit Pawar advised a loyal worker, VIlas Zodape, who vowed not to cut his hair until Pawar became CM, to focus on public service and party building instead. Pawar emphasized that becoming CM requires numbers, not long hair.
Web Summary : अजित पवार ने एक निष्ठावान कार्यकर्ता विलास झोडापे, जिसने पवार के मुख्यमंत्री बनने तक बाल न काटने की कसम खाई थी, को सार्वजनिक सेवा और पार्टी बनाने पर ध्यान केंद्रित करने की सलाह दी। पवार ने जोर दिया कि मुख्यमंत्री बनने के लिए संख्या चाहिए, लंबे बाल नहीं।