शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

उज्वल निकम यांनी कसाबच्या बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केले

By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2024 18:22 IST

विजय वडेट्टीवार यांचा आरोप : भाजपने देशद्रोह्याला तिकीट दिले

नागपूर : उज्वल निकम यांनी कसाबच्या बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केले होते. कसाबला कोणी बिर्याणी देईल का आणि नंतर उज्वल निकम यांनी ते मान्य केले. जे न्यायालयात पुरावे द्यायला पाहिजे होते ते दिले नाहीत, हे कसले वकील, हे देशद्रोही आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

      गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, हेमंत करकरे यांचा खून झाला ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती. ती आरएसएसच्या समर्पित एका पोलिस अधिकाऱ्याची होती. त्यावेळी हे सत्य कोर्टापासून लपवल्या गेले. अशा देशद्रोह्याला जर भाजप तिकीट देत असेल तर भाजप अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालणार का ,असा सवाल त्यांनी केला. भाजप शिंदे गटाने भ्रष्टाचार करणाऱ्याला किती मानाचे स्थान दिले आहे. ज्यांच्यावर किरीट सोमय्यानी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व आता भाजपचे उमेदवार आहेत. यावरूनच आता भाजप हा बेईमानांचा, चोरांचा पक्ष झालाय हे नव्याने सांगण्याची गरज नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

कर्नाटकमध्ये ज्याच्यावर बलात्काराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा बलात्काऱ्याला भाजप तिकीट देत असेल तर महिलांप्रती त्यांचे विचार कसे आहेत हे दिसून येते. ब्रूजभूषण सिंग, कुलभूषण सिंगर, पद्मराजन, कन्हैयालाल मिश्रा, चिन्मयानंद हे सर्व महिलांचे शोषण करणारे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरताहेत. भाजपने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. जनता आता हे ओळखून आहे. म्हणून तिसऱ्या चौथा टप्प्यात लोक यांना गाडण्याची वाट बघत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणताही काँग्रेसचा नेता भाजपमध्ये जाणार नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर कधी कधी अशा पुड्या सोडतात, अनेकदा त्या पुड्या मध्ये काही निघत नाही, असा चिमटाही त्यांनी आंबेडकरांना काढला.

सलमान खान प्रकरणातील आरोपी आत्महत्या की खून ?- सलमान खान प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. पण कदाचित त्याचा खून झाला असावा असा संशय आहे. कस्टडीमध्ये आरोपीचा मृत्यू होतो. एवढा मोठा हायप्रोफाईल विषय असताना या प्रकरणाला काही कलाटणी देण्याचा उद्देश आहे का, याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. पोलीस ठाण्यात आत्महत्या किंवा मृत्यू झाला. नितिमत्तेच्या आणि नैतिकतेच्या दृष्टीने जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अपेक्षा होती. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसUjjwal Nikamउज्ज्वल निकमBJPभाजपा