गणेशोत्सवात कोविड सेंटरचा देखावा; प्रकाश गजभिये यांचा हिलटॉप का राजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 13:56 IST2020-08-25T13:56:14+5:302020-08-25T13:56:54+5:30
दरवर्षी आगळेवेगळे करण्याची परंपरा यंदाही शहरात आमदार प्रकाश गजभिये यांच्या हिलटॉप का राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाने कोविड सेंटर उभारत राखली आहे.

गणेशोत्सवात कोविड सेंटरचा देखावा; प्रकाश गजभिये यांचा हिलटॉप का राजा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दरवर्षी आगळेवेगळे करण्याची परंपरा यंदाही शहरात आमदार प्रकाश गजभिये यांच्या हिलटॉप का राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाने कोविड सेंटर उभारत राखली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून अवघ्या जगाला ग्रासलेल्या कोविड १९ या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झालेल्या कोविड सेंटरचे दृश्य यात दाखवण्यात आले आहे. कोविड पेशंट, पीपीई कीट घातलेले डॉक्टर व परिचारिका आणि सॅनिटायझरचा नियम कसोशीने पाळणारा सुरक्षा रक्षक असे यात दाखवले आहे. या ठिकाणी जाणाºया भक्तांना सर्व नियमांचे पालन करूनच आत प्रवेश दिला जातो आहे.