शहरं
Join us  
Trending Stories
1
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
2
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
3
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
4
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
5
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
6
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
7
Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण...
8
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
9
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश
10
"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
11
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
12
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
13
Shravan Special Recipe: श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; कमी साहित्यात चविष्ट रेसेपी 
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
15
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
16
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
17
घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक
18
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
19
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
20
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला

Video : धक्कादायक ! युवासेना तालुका प्रमुखाकडून ट्रक चालकाला वरती टांगून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 01:12 IST

मारहाणीचा व्हिडीओ आरोपीपैकी कुणीतरी व्हायरल केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने  घेत वाडी पोलिसांना सूचना देत चौकशी करण्याचे आदेश दिली.

 नागपूर : गोदामातून माल घेवून तो संबंधीत स्थळी न पोहोचविता या कामासाठी दिलेला अ‍ॅडव्हास परस्पर खर्च करणाºया चालकाला ट्रक मालकाकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी दखल घेत आरोपी युवा सेनेचा तालुका प्रमुख अखिल पोहनकर व त्याचा साथीदार अमित ठाकरे (रा.दत्तवाडी) याला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवासेना तालूका प्रमुख अखिल भावराव पोहनकर (३०) रा. दत्तवाडी यांच्या ट्रकवर विक्की सुनील आगलावे हा चालक म्हणून अनेक दिवसांपासून काम करतो. एक आठवड्यापूर्वी वाडी येथील गोदमातून त्रिवेंद्रम येथील माल ट्रकमध्ये भरला होता. तसेच अडव्हान्स म्हणून ३०  हजार व डिझेल भरण्यासाठी ३ हजार चालकाला दिले होते. चालक विक्की याने ट्रक गोदाममधून काढून त्रिवेंद्रम येथे न नेता  अन्य ठिकाणी नेऊन ठेवला. यासोबतच ट्रक मालकाने अ‍ॅडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम परस्पर खर्च केली. पोहनकर यांना याबाबत कळले ते चालकाचा शोध घेत होता. शनिवारी तो त्यांना गवसला. पोहनकर यांनी आपल्या अन्य साथीदारासह विक्की याला वडधामना येथील ट्रान्सपोर्ट कार्यालयात नेले. तिथे त्याला अमानुषरित्या मारहाण करीत चित्रीकरण करण्यात आले. मारहाणीचा व्हिडीओ आरोपीपैकी कुणीतरी व्हायरल केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने  घेत वाडी पोलिसांना सूचना देत चौकशी करण्याचे आदेश दिली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आरोपी अखिल व त्याचा साथीदार अमित ठाकरे यास अटक करून भांदविच्या कलम ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील इतर फरार आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या नेतृत्वातील पथक शोध घेत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी