१२० कोटींचे दान देण्याचा ‘तो व्हिडिओ’ बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 23:29 IST2021-04-29T23:27:06+5:302021-04-29T23:29:33+5:30

fake video दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने ऑक्सिजन प्लांटसाठी १२० कोटी रुपयांचे दान दिल्याची माहिती सांगणारा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट आहे. हा व्हिडिओ नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात गुरुवारी नोंदविण्यात आली.

'That video' of donating Rs 120 crore is fake | १२० कोटींचे दान देण्याचा ‘तो व्हिडिओ’ बनावट

१२० कोटींचे दान देण्याचा ‘तो व्हिडिओ’ बनावट

ठळक मुद्देअजनी ठाण्यात तक्रार : आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने ऑक्सिजन प्लांटसाठी १२० कोटी रुपयांचे दान दिल्याची माहिती सांगणारा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट आहे. हा व्हिडिओ नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात गुरुवारी नोंदविण्यात आली. नुकताच हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यात दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने ऑक्सिजन प्लांटसाठी १२० कोटी रुपये दान करण्यात आल्याची चुकीची माहिती सांगितली गेली होती. हा व्हिडिओ बनावट असल्याचे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘भीमराव की बेटी’ या सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष ॲड. सोनिया गजभिये यांनी आज अजनी पोलीस ठाण्यात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवली. या तक्रारीत तसेच पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्या आणि दीक्षाभूमीसारख्या पवित्र स्थळाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना शोधून काढा, तसेच त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी ॲड. गजभिये यांनी केली.

Web Title: 'That video' of donating Rs 120 crore is fake