शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी-महाराष्ट्रवादी आज आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:04 IST

१ मे रोजी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी तयारी केली आहे. मात्र दुसरीकडे विदर्भवाद्यांनी निषेधाची तयारी चालविली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे तर विदर्भ कनेक्टनेही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रवादीही महाराष्ट्राचा झेंडा घेउन उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. विशेषत: शिवसेना व मनसेतर्फे विदर्भवाद्यांच्या भूमिकेला विरोध केला जातो. यावर्षी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा झेंडा आमनेसामने उभा ठाकण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे काळा दिवस : विदर्भ कनेक्टचे आंदोलन शिवसेना, मनसेची भूमिका अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १ मे रोजी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी तयारी केली आहे. मात्र दुसरीकडे विदर्भवाद्यांनी निषेधाची तयारी चालविली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे तर विदर्भ कनेक्टनेही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रवादीही महाराष्ट्राचा झेंडा घेउन उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. विशेषत: शिवसेना व मनसेतर्फे विदर्भवाद्यांच्या भूमिकेला विरोध केला जातो. यावर्षी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा झेंडा आमनेसामने उभा ठाकण्याची शक्यता आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्रदिनाचा निषेध नोंदवित दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. नुकतेच समितीच्या कोर कमिटीच्या बैठकीत याबाबत घोषणा केली होती. बैठकीदरम्यान डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रंजना मामर्डे, प्रबीरकुमार चक्रवर्ती, प्रा. पुुरुषोत्तम पाटील, सुनील वडस्कर, मुकेश मासूरकर, विजया धोटे, अरुण केदार उपस्थित होते. विदर्भाचे कार्यकर्ते काळ्या फिती लावून संविधान चौकात निषेध आंदोलन करणार आहेत. सत्तापक्ष भाजपाने स्वतंत्र्य विदर्भ राज्याचे आश्वासन पाळले नसून विदर्भातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. पाच महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असून विदर्भाच्या झेंड्यावर सर्व जागा लढविण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. विदर्भाला विरोध करणाऱ्या पक्षांना विदर्भातून हद्दपार करण्याचे आवाहन करण्यात आले.दुसरीकडे विविध विदर्भवादी संघटनाही निषेध आंदोलन करणार आहे. विदर्भ कनेक्ट, विदर्भ राज्य आघाडी आणि विदर्भ समर्थक संघटनांच्यावतीने काळा दिवस पाळण्यात येत असून विदर्भ चंडिका मंदिरात विदर्भाचा झेंडा फडकावण्यात येणार आहे. सकाळी ७.३० वाजता संविधान चौकातून बाईक, कार रॅली काढण्यात येईल. रॅलीला विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करतील. रॅली विदर्भ चंडिका माता मंदिर, शहीद चौक येथे पोहोचल्यानंतर महाआरती करण्यात येईल. सकाळी ९ वाजता श्रीहरी अणे यांच्या हस्ते विदर्भ आंदोलनाचा ध्वज फडकविण्यात येईल.दरम्यान दरवर्षी विदर्भवाद्यांना आव्हान देत शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्र दिवस साजरा केला जातो. यावर्षी दोन्ही पक्षातर्फे भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राचा झेंडा फडकविला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्रagitationआंदोलन