शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

विदर्भातील नझूल जमिनींची मालकी मिळणार : ३५ हजारांहून अधिक भूपट्टाधारकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:41 PM

नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनींची अधिमूल्य (प्रीमियम) भरून मालकी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भाडेतत्त्वावर असलेल्या जमिनी आता संबंधितांच्या मालकीच्या होतील. या निर्णयामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे आणि अन्य व्यवहार भूपट्टाधारकांना अन्य जमीन मालकांप्रमाणेच करता येतील. या निर्णयामुळे विदर्भातील ३५ हजारांहून अधिक भूपट्टाधारकांना लाभ मिळेल व त्यातही नागपूर विभागाला सर्वाधिक फायदा पोहोचणार आहे.

ठळक मुद्देलिजधारकांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनींची अधिमूल्य (प्रीमियम) भरून मालकी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भाडेतत्त्वावर असलेल्या जमिनी आता संबंधितांच्या मालकीच्या होतील. या निर्णयामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे आणि अन्य व्यवहार भूपट्टाधारकांना अन्य जमीन मालकांप्रमाणेच करता येतील. या निर्णयामुळे विदर्भातील ३५ हजारांहून अधिक भूपट्टाधारकांना लाभ मिळेल व त्यातही नागपूर विभागाला सर्वाधिक फायदा पोहोचणार आहे.निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रयोजनासाठी तत्कालीन मध्य प्रांत आणि बेरार भागात लागू असलेल्या कायद्यानुसार नागपूर व अमरावती या महसुली विभागात मोठ्या प्रमाणात नझूल जमिनी भाडेपट्ट्याने दिल्या होत्या. या जमिनीच्या भाडेपट्ट्यात १ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भाडेकराराच्या नूतनीकरणात उदासीनता दिसून येत होती. त्यामुळे या शासन निर्णयात सुधारणा करण्यासह भुईभाडे दर कमी करून सुधारित धोरण निश्चित करण्यात आले होते, तरीदेखील भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणास प्रतिसाद मिळत नव्हता. त्यासोबतच या जमिनीचे मालकी हक्क देण्याची वारंवार मागणी होत होती. त्यामुळे या जमिनी ‘फ्री-होल्ड’ करण्याबाबत शिफारस करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने जमिनी ‘फ्री-होल्ड’ करण्याची शिफारस केली होती.५ टक्के अधिभार भरावा लागणारनिवासी प्रयोजनासाठी मिळालेल्या नझूल जमिनींच्या मालकीसाठी रेडिरेकनर दरानुसार होणाऱ्या बाजारमूल्याच्या ५ टक्के अधिभार भरावा लागेल. वाणिज्यिक व औद्योगिक प्रयोजनासाठीच्या जमिनींकरिता १० टक्के अधिभार भरावा लागेल. ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असून सवलतीचा लाभ घ्यायचा नसेल त्या भाडेपट्टाधारकांना जुन्या भाडेपट्टा धोरणानुसार भाडेपट्टा पुढे सुरू ठेवता येणार आहे. ज्या लोकांना नझूलची जागा देण्यात आली आहे, त्यांना दर ३० वर्षांनी परत ‘लिज’ घ्यावी लागत होती. आता ही डोकेदुखी दूर झाली आहे. त्यांना दरवर्षी नझूल विभागाला वार्षिक ‘ग्राऊंड रेंट’देखील द्यावा लागणार नाही. तसेच परिसरात निर्माणकार्य करणे किंवा त्याला विकण्यासाठी नझूल विभागाची परवानगी घेणेदेखील आवश्यक राहणार नाही.नागपुरातील सुमारे ११ हजार संपत्तीधारकांना फायदानझूल संपत्तीला ‘फ्री होल्ड’ करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा नागपूर शहराला झाला आहे. शहरात एकूण १० हजार ९६३ नझूलच्या संपत्ती आहेत, तर विदर्भात हीच संख्या ३५ हजार ३४६ इतकी आहे. नागपुरातील नझूलच्या संपत्ती मुख्यत्वेकरून धंतोली, रामदासपेठ, शिवाजीनगर, सीताबर्डी, धरमपेठ, सिव्हिल लाईन्स, अमरावती रोड, खामला, जरीपटका, सदर, अंबाझरी येथे पसरल्या आहेत. या भागांमध्ये बहुमजली इमारतींची संख्या जास्त असल्यामुळे या घोषणेचा लाभ एक लाखांहून अधिक लोकांना पोहोचेल. अमरावती विभागात १० हजार ५२८ नझूल संपत्ती आहेत. नागपूर नझूल प्लॉट ओनर्स असोसिएशनकडून सातत्याने ही मागणी करण्यात येत होती. या घोषणेमुळे लीजधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.विदर्भालाच फायदा का?या घोषणेमुळे केवळ विदर्भालाच दिलासा का मिळाला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. १९५६ पर्यंत विदर्भ ‘सीपी अ‍ॅन्ड बेरार’ राज्याचा भाग होता, तर शेष महाराष्ट्र तत्कालीन मुंबई प्रांत किंवा हैदराबादच्या निझामाच्या क्षेत्रात होता. ‘लिज’वर जागा देण्याची (नझूल) प्रणाली केवळ ‘सीपी अ‍ॅन्ड बेरार’मध्येच होती. त्यामुळे सद्यस्थितीत नझूलची जागा विदर्भातच आहे.

 

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागVidarbhaविदर्भ