शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

१०० व्या नाट्यसंमेलनाच्या रंगात रंगणार विदर्भ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:44 IST

९९व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनानंतर १०० व्या नाट्य संमेलनाविषयी गेले वर्षभर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. जवळपास ते सर्व तर्क थोड्याथोड्याशा फरकाने खरेच ठरल्याची ग्वाही बुधवारी मिळाली. सांगली येथून वाजणारी १०० व्या नाट्य संमेलनाची वारी व्हाया विदर्भ मुंबईला पोहोचणार आहे.

ठळक मुद्देगुढीपाडव्याला तंजावूरपासून वाजणार नांदीप्रत्येक स्थळी सात दिवस रंगणार संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ९९व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनानंतर १०० व्या नाट्य संमेलनाविषयी गेले वर्षभर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. जवळपास ते सर्व तर्क थोड्याथोड्याशा फरकाने खरेच ठरल्याची ग्वाही बुधवारी मिळाली. सांगली येथून वाजणारी १०० व्या नाट्य संमेलनाची वारी व्हाया विदर्भ मुंबईला पोहोचणार आहे. त्याअनुषंगाने विदर्भात नाट्य संमेलनाच्या वारीचा गजर तब्बल २१ दिवस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अ.भा. मराठी नाट्य संमेलन, मुंबईचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार जागतिक रंगभूमी दिनी २७ मार्च रोजी सांगली येथे १०० व्या नाट्य संमेलनाची नांदी वाजणार आहे. तत्पूर्वी गुढीपाडव्याला २५ मार्च रोजी तंजावूर येथे मराठी रंगभूमीचे जनक व्यंकोजी राजांच्या समाधीला नमन केले जाईल तर मुंबई येथे १४ जून रोजी संमेलनाचा समारोप होणार आहे. दरम्यान ७ जूनपर्यंत ही वारी महाराष्ट्रातील दहा प्रमुख स्थळांवरून मुंबईला पोहोचणार आहे. या प्रत्येक स्थळी होणारी ही छोटी छोटी संमेलने शनिवार-रविवार अशी द्विदिवसीय असणार आहेत. या संमेलनांपूर्वी येणाऱ्या सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवारी संमेलनांतर्गत संमेलनस्थळाच्या नजिकच्या छोट्या छोट्या गावांमध्ये प्रत्येक दिवशी नाटकांचे सादरीकरण केले जाऊन, त्या भागात नाटक पोहोचवले जाणार आहे. त्यानंतर शनिवारी स्थानिक पातळीवरील नाटकांचे स्पर्धात्मक सादरीकरण होईल. यातील उत्तम सादरीकरणाला मुंबई येथे होणाºया समारोपीय सोहळ्यात सादरीकरणाची संधी मिळेल व पुरस्कृत करण्यात येणार आहे तर रविवारी नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीतर्फे स्थानिक नागरिकांशी सुसंवाद निर्माण करणारे नाट्यसंगीत, संगीत नाटक किंवा नाट्यचर्चांचे आयोजन केले जाणार असल्याचे मंगेश कदम यांनी सांगितले. अशा तऱ्हेने दहाही स्थळी प्रत्येकी सात दिवस नाट्यसंमेलनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थळांची निवड लवकरच होणार असून, विदर्भात किमान तीन ठिकाणी अशी नाट्य संमेलने होण्याची शक्यता आहे.हे संमेलन उत्सवी नसून सर्वांना व्यापणारे ठरेल - मंगेश कदम१०० वे नाट्य संमेलन हे दरवेळेसारखे उत्सवी असणार नाही. या संमेलनाद्वारे तळागाळातल्या रंगकर्मी व रंगरसिकांपर्यंत पोहोचण्यासोबतच, जिथे कधीच नाटके झाली नाही अशा ठिकाणी ज्योत प्रज्वलित करणारे ठरणार आहे. त्यामुळेच, हे नाट्य संमेलन विशेष ठरणार असल्याची भावना नाट्य परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी व्यक्त केली.मुंबईत होणार महासंमेलननाट्य संमेलनाचा समारोपीय सोहळा मुंबईमध्ये १३ व १४ जून रोजी होणार असून, त्यापूर्वी ८ ते १२ जून रोजी नाटकांचा राष्ट्रीय महोत्सव होणार असल्याचे मंगेश कदम यांनी सांगितले. अशा तºहेने १०० व्या नाट्य संमेलनाचे महासंमेलन मुंबईत होणार आहे. समारोपानंतरही ही वारी महाराष्ट्राबाहेर इंदूर, बेंगळूरु, हैदराबाद आणि दिल्ली येथे पोहोचेल. ७ नोव्हेंबरपर्यंत १०० व्या नाट्य संमेलनाचा हा सोहळा देशभरात साजरा होईल, असे कदम म्हणाले.नागपूरला मिळणार सलग दुसऱ्यांदा मानविदर्भात साधारणत: तीन ठिकाणी १०० व्या नाट्यसंमेलनाची छोटी संमेलने होतील. विदर्भाची जबाबदारी नाट्य परिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून, स्थळे अद्याप निश्चित झाली नसली तरी नागपूर, अमरावती व कारंजा (वाशिम) येथे ही संमेलने पार पडण्याची शक्यता आहे. नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापन दिन १४ एप्रिल रोजी असतो. त्याअनुषंगाने विदर्भातील नाट्य संमेलन १४ एप्रिलपासूनच पुढचे २१ दिवस रंगण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NatakनाटकmarathiमराठीVidarbhaविदर्भ