शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ ऐन हिवाळ्यातच जलसंकटाच्या उंबरठ्यावर; धरणांमध्ये ३४ टक्केच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 14:16 IST

नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागात ३५ टक्के तर अमरावती विभागात ३३ टक्के जलसाठा

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना केल्यास सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. कमी पडलेल्या पावसामुळे विदर्भातील धरणे पुरेशा क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे नव्या वर्षात ऐन हिवाळ्यातच संपूर्ण विदर्भ जलसंकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला पेंच धरणाचा मोठा आधार आहे. पण मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे यंदा पेंच धरण पुरेसे भरलेले नाही. त्यामुळे नागपूर शहराला पुरवठा होणाºया पिण्याच्या पाण्यावरही काही प्रमाणात निर्बंध यायला लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांमध्ये असलेला मर्यादीत पाणीसाठा विचारात घेता नागपुरात ३० टक्के पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगतानाच महापालिकेकडून नागपूरकरांना देण्यात येणाºया पाण्याचे आॅडीट करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगीतले.राज्यातील धरणांमध्ये ६४ टक्केपाणी साठा शिल्लक आहे. तर विदर्भात अवघा ३२.३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या तुलनेत सध्या विदभार्तील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन हिवाळ्यातच विदर्भातील बºयाच भागात पाणीटंचाईची झळ पोहोचायला लागली आहे. नागपूर सारख्या शहरात पाणीपुरवठा करणाºया टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. जे पाणी शिल्लक आहे. ते पिण्यासाठी पुरेसे आहे. असे सिंचन विभागाचे अधिकारी सांगतात पण आणिबाणीप्रमाणे काटकसर करून पाणी वापरण्याचा सावधगिरीचा सल्लाही सिंचन विभाग देत आहे. येत्या पावसाळयापर्यंत ही पाणीटंचाई कायम राहण्याची शक्यता आहे.विदर्भातील एकूण ;मोठी मध्यम लघु धरणांची संख्या आणि पाणीसाठाविभाग धरणे                 सध्याचा पाणीसाठा                       गेल्या वर्षातील पाणीसाठानागपूर                          ३८५ ३०.२५ टक्के                       ४३.७० टक्केअमरावती                      ४४३ ३३.६७ टक्के                        ६१.७९ टक्केनागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या किती आहे पाणीसाठाजिल्हा धरण                         सध्याचा पाणीसाठा                               गेल्या वर्षाचा पाणीसाठानागपूर कामठी खैरी              ३७.६४ टक्के                                        ४३.५० टक्केनागपूर तोतलाडोह                 २१.६२ टक्के                                         ३८.४३ टक्केनागपूर खिंडसी                     २० टक्केभंडारा गोसीखूर्द                   २०.३८ टक्केगोंदिया इटियाडोह                   ३२.६४ टक्के                                       ८८.३९ टक्के

 

टॅग्स :Waterपाणी