Vidarbha insults Vidarbha for development: Accusation of Nitin Raut | विकासाचा नावावार विदर्भाचा केला अपमान : नितीन राऊत यांचा आरोप
विकासाचा नावावार विदर्भाचा केला अपमान : नितीन राऊत यांचा आरोप

ठळक मुद्देकुठलीच विकासकामे थांबणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाविकास आघाडीने सरकार स्थापन होताच राज्यातील एकूणच आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यात हे स्पष्ट झाले की, फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवले आहे. राज्यावर एकूण ६.७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ते गेले आहेत. यावर निश्चितच श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी टीका करीत या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. विकास कामे थांबणार नाही, असे राज्यातील नवनियुक्त मंत्री नितीन राऊत यांनी येथे सांगितले.
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन राऊत पहिल्यांदाच नागपुरात आले. विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते रॅलीने दीक्षाभूमीला आले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना वंदन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नितीन राऊत म्हणाले, गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने विकासाच्या नावावर विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. केवळ खोटे बोलत राहिले. परंतु शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडी सरकार विदर्भावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. येथील युवक व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही विदर्भाच्या विकासात कुठलीही अडचण येऊ देणार नाही.
काँग्रेसची ‘आगेकूच’ प्रारंभ
राऊत यांनी सांगितले की, त्यांच्या रूपात आंबेडकरी आंदोलनातील एका कार्यकर्त्याला काँग्रेसने मंत्री बनवले. त्याचप्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करणाºया बहुजन समाजातील नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले. या नियुक्तीद्वारे कॉँग्रेसने राज्यातील जनतेला समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षतेचा स्पष्ट संदेश दिला आहे. आता भाजपची आगेकूच संपली असून, कॉँग्रेसची आगेकूच प्रारंभ झाली आहे.
दाल मे कुछ काला है
भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत हेगडे यांनी ४० हजार कोटी केंद्राला परत केलेल्या वक्तव्याबाबत नितीन राऊत यांना विचारणा केली असता, हेगडे हे भाजपचे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ‘दाल मे कुछ काला है’ हे निश्चित. याबाबत फडणवीस यांनीच स्पष्टीकरण द्यावे. शेतकºयांसाठी मिळालेला पैसा दोन दिवसात परत कसा गेला. हे त्यांनी सांगावे, असेही राऊत म्हणाले.

 

Web Title: Vidarbha insults Vidarbha for development: Accusation of Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.