शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या निधीतही विदर्भावर अन्याय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 11:01 IST

विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाटेला अवघा १८ टक्के निधीच आला. तर दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरित करण्यात आला.

ठळक मुद्देरुग्णसंख्या जास्त मात्र राज्य शासनाचा कमी निधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) राज्य शासनाने कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी सर्व जिल्ह्यांना निधीचे वितरण केले. दोन्ही लाटांमध्ये महाराष्ट्र पोळून निघाला असताना मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत शासनाने निधी वितरणातदेखील अन्याय केला. विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाटेला अवघा १८ टक्के निधीच आला. तर दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरित करण्यात आला.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची एकूण रक्कम ३४३६ कोटी ८० लाख इतकी असून, यात केंद्राचा हिस्सा ७५ टक्के इतका आहे. कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी शासनाने मार्च २०२० मध्ये ३५ टक्के व सप्टेंबर २०२० मध्ये ५० टक्के खर्चाची मर्यादा निश्चित केली. सप्टेंबरनंतर ५० टक्के निधीचे वितरण व्हायला हवे होते. ऑगस्ट २०२१ पर्यंत प्रत्यक्षात १ हजार ३६६ कोटी ६८ लाख ४३ हजार इतक्याच निधीचे वितरण करण्यात आले. ही टक्केवारी ३९ टक्के इतकीच होती.

२०२१ साली सप्टेंबर महिन्यापासून ‘कोरोना’बाधितांची संख्या कमी व्हायला लागली. नागपूर व अमरावती विभाग मिळून ऑगस्ट महिन्यापर्यंत ११ लाखांहून अधिक रुग्ण सापडले व २० हजारांहून अधिक मृत्यू झाले; परंतु प्रत्यक्षात २५१ कोटी १९ लाख ४४ हजारांचीच रक्कम वितरित करण्यात आली. दुसरीकडे या कालावधीपर्यंत औरंगाबाद विभागात ६ लाख ३५ हजार ८४६ रुग्ण आढळले व १६ हजार ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला; परंतु तरीदेखील विभागाला विदर्भाहून जास्त अनुदान मिळाले.

औरंगाबादला मिळालेल्या निधीचा आकडा ३१२ कोटी ८८ लाख ९८ हजार इतका होता. नाशिकमध्येदेखील साडेनऊ लाखांहून अधिक रुग्ण असताना १५५ कोटींचीच रक्कम मिळाली. कोरोनाची सर्वात जास्त दाहकता पुणे विभागात होती. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर मध्यापर्यंत तेथे जवळपास २० लाख रुग्ण आढळले व ४२ हजारांहून अधिक मृत्यू झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत विभागाला ३४८ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले. तर कोकण विभागाला ३२४ कोटी ६१ लाख प्राप्त झाले.

मंत्र्यांचे मौन का ?

नागपूर व अमरावती विभागातील मोठे नेते महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आहेत. असे असतानादेखील विदर्भाच्या वाट्याला कमी निधी आला व त्यावर शासनाला जाब विचारण्याची तसदी नेत्यांनी घेतली नाही. दुसऱ्या लाटेनंतरचा हाहाकार सर्वांंनीच अनुभवला. कमीत कमी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तरी आवश्यक निधी खेचून आणावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विभाग - एसडीआरएफ अंतर्गत मिळालेला निधी (ऑगस्ट २०२१ पर्यंत)

नागपूर - १७६ कोटी ९९ लाख २८ हजार

अमरावती - ७४ कोटी २० लाख १६ हजार

औरंगाबाद - ३१२ कोटी ८८ लाख ९८ हजार

नाशिक - १३१ कोटी ५१ लाख ८४ हजार

पुणे - ३४६ कोटी ४६ लाख ३६ हजार

कोकण - ३२४ कोटी ६१ लाख ८१ हजार

टॅग्स :GovernmentसरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याfundsनिधीVidarbhaविदर्भ