शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

विदर्भात उशिरा आलो, हा आरोप चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:48 IST

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी वैदर्भीय मतदारांच्या भेटी घेतल्या, मात्र राजन खान यांनी आतापर्यंत विदर्भात पाऊल ठेवले नव्हते.

ठळक मुद्देराजन खान : मी संपूर्ण महाराष्टÑाचा प्रतिनिधी

ऑनलाईन लोकमत नागपूर : अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी वैदर्भीय मतदारांच्या भेटी घेतल्या, मात्र राजन खान यांनी आतापर्यंत विदर्भात पाऊल ठेवले नव्हते. त्यामुळे राजन खान यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष असून ते वैदर्भीय मतदारांना महत्त्व देत नाहीत, अशी टीका त्यांच्यावर होत होती. त्यावर राजन खान यांनी या आरोपांचे खंडन केले. मी विदर्भ, मराठवाडा किंवा प. महाराष्ट्राचा सुपुत्र नाही तर अख्ख्या महाराष्ट्रचा प्रतिनिधी आहे. या धावपळीत कदाचित भेटायला उशीर झाला, मात्र मी माझी भूमिका साहित्य महामंडळ व मतदारांपर्यंत पत्रव्यवहाराद्वारे पोहचविली आहे, असा खुलासा त्यांनी रविवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.समाज आणि साहित्याची सेवा करणे हे साहित्यिकाचे काम असते व ते आतापर्यंत मी प्रामाणिकपणे करीत आलो आहे. संमेलनाचे अध्यक्षपद लाभाचे पद नाही, मात्र मराठी जनमानसांच्या दृष्टीने सन्मानाचे मानले जाते. त्यामुळे संमेलन अध्यक्ष झालो तर या साहित्य सेवेच्या कामाला नवा आयाम मिळेल. मात्र निवडणूक लढवत असलो तरी कुणाशी ईर्षा, असूया किंवा स्पर्धा नाही.त्यामुळे जिंकलो तरी अत्याधिक खूश होणार नाही किंवा हरलो तर निराशही होणार नाही. साहित्य हा जगण्याचा प्रवास असून तो पुढेही असाच सुरू राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत अध्यक्षपदाच्या प्रचलित निवडणुकीवरून टीका होत आहे. मात्र सध्यातरी हीच प्रक्रिया सुरू असल्याने ती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मात्र भविष्यात ही पद्धत बदलेल आणि गुणवत्तेच्या आधारावर निवड होईल, असेही ते म्हणाले.हा किळसवाणा प्रकार दुरुस्त करायचा आहेअध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चालणारे गटातटाचे खेळ, प्रादेशिक वादामुळे साहित्य संमेलन बदनाम झाले आहे. संमेलनाकडे सामान्य माणसे कुचेष्टेने पाहू लागले आहेत. अध्यक्षपदासाठी अमूक व्यक्ती किंवा साहित्य संघटनांची लांगुलचालन करावे लागणे किंवा उमेदवाराने संमेलनासाठी प्रायोजकत्व मिळवून देण्याची भाषा करणे, हा साहित्यसृष्टीतील किळसवाणा प्रकार आहे. साहित्य ही पावित्र्याची गोष्ट आहे, मात्र अशा प्रकारामुळे किळसवाणे होत आहे. त्यामुळे सामान्य मराठी माणूसच नाही तर दिग्गज साहित्यिकही इथे येऊ इच्छित नाही. मलाही तसेच सल्ले दिले गेले आहेत. मात्र ही साहित्यसृष्टी व या संस्था माझ्या आहेत. त्यामुळे माझे घर दुरुस्त करणे माझी जबाबदारी असल्याने मी निवडणूक लढवीत असल्याचे राजन खान यांनी यावेळी सांगितले.कर्नाटक सरकारची भूमिका घटनाविरोधीकर्नाटकच्या सीमा भागातील लोकांवर कानडी भाषेची सक्ती करणे ही कन्नड सरकारची भूमिका घटनाविरोधी आहे. महाराष्ट शासनाने कधी शासकीय स्तरावर इतर भाषांचा द्वेष केला नाही, उलट सन्मानच केला आहे. महाराष्ट्राची ही भूमिका कन्नड शासनाला समजावून सांगण्यासाठी लेखकांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर हा एक प्रयत्न करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.