विदर्भ ऑटोमोबाईल डिलर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:55+5:302021-02-06T04:11:55+5:30

- वार्षिक सर्वसाधारण सभा : कोरोना काळात राबविलेल्या उपक्रमांचे अभिनंदन नागपूर : ‘फाडा’शी संलग्न विदर्भ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनच्या (‘वाडा’) ...

Vidarbha Automobile Dealers | विदर्भ ऑटोमोबाईल डिलर्स

विदर्भ ऑटोमोबाईल डिलर्स

- वार्षिक सर्वसाधारण सभा : कोरोना काळात राबविलेल्या उपक्रमांचे अभिनंदन

नागपूर : ‘फाडा’शी संलग्न विदर्भ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनच्या (‘वाडा’) वार्षिक सर्वसाधारण सभेत इरोज मोटर्सचे अनुज पांडे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

सभेत प्रोव्हेंशियल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘वाडा’चे निवर्तमान अध्यक्ष आशिष काळे यांनी सदस्यांचे स्वागत केले. ‘वाडा’चे सचिव अनुज पांडे आणि उपाध्यक्ष अचल गांधी यांनी गतवर्षीच्या अहवालाचे वाचन केले. गेल्या वर्षी कोरोना काळात ऑटोमोबाईल व्यावसायिकांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे अभिनंदन केले. कोषाध्यक्ष शैलेंद्र वर्मा आणि सहकोषाध्यक्ष पंकज मल्होत्रा यांनी संपलेल्या वर्षाचा वित्तीय अहवाल सादर केला.

निवर्तमान अध्यक्ष आशिष काळे यांनी अनुज पांडे यांचे उत्तराधिकारी म्हणून नाव प्रस्तावित केले आणि संपूर्ण व्यावसायिकांनी एकमताने पाठिंबा दिला. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अनुज पांडे, उपाध्यक्ष अचल गांधी आणि कोषाध्यक्षपदी शैलेंद्र यांची घोषणा करण्यात आली. लवकरच असोसिएशनच्या नवीन प्रशासकीय मंडळाची घोषणा करण्यात येणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

‘वाडा’चे सदस्य ए. के. गांधी, अजय पाटणी, निखिल कुसुमगर, नरेश पाटणी आणि संपूर्ण व्यावसायिकांनी निवर्तमान अध्यक्ष आशिष काळे यांचे सुपरफॉर्मिंग टर्म यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. नवीन कार्यकारिणीने मेगा ‘वाडा’ ऑटो एक्स्पोचे आयोजन ऑक्टोबरमध्ये अ‍ॅडमार्क इव्हेंटसोबत करणार असल्याची घोषणा केली. अरुण ऑटो ग्रुपचे अजय पाटणी यांनी आभार मानले. याप्रसंगी निखिल कुसुमगर, हेमांग पारीख, उमेश पाटणी, देव कनोरिया, विशाल बरबटे, नीलेश बरबटे, गौतम काळे, कार्तिक काळे, चिराग सेठ, प्रवीण चांडक, रूषभ थापर, अक्षित नांगिया, हिमांशू आर्य, विलास हरडे, अरुण अग्रवाल, अनुज जेजानी आणि अ‍ॅडमार्क इव्हेंटचे प्रमोद बत्रा उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन अ‍ॅडमार्क टीमने केले. (वा.प्र.)

Web Title: Vidarbha Automobile Dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.