शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव विजबिलावरून विदर्भवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 23:43 IST

कोरोनाच्या संकटादरम्यान वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीने याविरुद्ध आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत शुक्रवारी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ‘वीज बिल वापसी’ आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते ऊर्जामंत्र्यांना बिल परत करण्यासाठी जात असताना पोलिसांनी विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांना अटक केली.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन, अनेकांना अटक व सुटकाविदर्भाला वीज बिल मुक्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटादरम्यान वाढीव वीजबिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीने याविरुद्ध आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत शुक्रवारी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ‘वीजबिल वापसी’ आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते ऊर्जामंत्र्यांना बिल परत करण्यासाठी जात असताना पोलिसांनी विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांना अटक केली. काही वेळानंतर आंदोलकांना सोडण्यात आले.कोरोना काळातील वीज बिलापासून विदर्भाला मुक्त करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व करणारे राम नेवले यांनी सांगितले की, आज विदर्भभर वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत नागपुरात ऊर्जामंत्र्यांना वीज बिल परत करण्यासाठी कार्यकर्ते जात होते. परंतु पोलिसांनी दडपशाही करीत त्यांना बेझनबाग चौकातच अडवले. बळजबरीने पोलीस व्हॅनमध्ये बसवले व ऊर्जामंत्र्यांच्या घराकडे जाऊ दिले नाही. दरम्यान, यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. सर्व आंदोलनकांना जरीपटका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे आवारातच एक छोटेखानी सभा झाली.आंदोलनात राम नेवले, मुकेश मासुरकर, ज्योती खांडेकर, प्रशांत मुळे, रेखा निमजे, माधुरी चव्हाण, गुलाबराव धांडे, प्यारूभाई, साधना श्रीवास्तव, प्रीती दिडमुठे, शोभा येवले, नरेश निमजे, रवी भामोडे, राजेंद्र सतई, नितीन अवस्थी, अनंतराव भुरे, मनोज झोडे, रमीज खान, लता सानेश्वर, जया चातुरकर, करुणा ढवळे, सुयोग निलदावार, शशी गुप्ता, अशोक येवले, शिशुपाल वाळदे, विभा शुक्ला, संजना संधू, कॅप्टन कर्नलसिंग, चंदा तातम, प्रशांत जयकुमार, रामभाऊ कावडकर, सुरेश निनावे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.मुख्यमंत्री-ऊर्जामंत्र्यांचे पुतळे पेटवणारकोरोनामुळे उद्योग, व्यापार, रोजगार बंद आहे. त्यामुळे बिल भरणे बंद आहे. कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल मुक्त करा, याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. सरकार जोवर हा निर्णय घेत नाही तोपर्यंत विदर्भभर वीज बिलाची होळी आंदोलन सुरू राहील. या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांचे पुतळेसुद्धा दहन करण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :agitationआंदोलनelectricityवीजbillबिल