पुण्यनगरीला विजयी दिलासा

By Admin | Updated: January 18, 2017 02:38 IST2017-01-18T02:38:33+5:302017-01-18T02:38:33+5:30

पुण्यनगरीने १९ व्या एसजेएएन आंतर प्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेतील स्वत:ची मोहीम मंगळवारी विजयाद्वारे संपविली.

Victory relief to Pune | पुण्यनगरीला विजयी दिलासा

पुण्यनगरीला विजयी दिलासा

एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट : लोकसत्तावर मात, श्रीधर हातागडेचे चार बळी
नागपूर : पुण्यनगरीने १९ व्या एसजेएएन आंतर प्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेतील स्वत:ची मोहीम मंगळवारी विजयाद्वारे संपविली. डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर पुण्यनगरीने लोकसत्तावर सहा गड्यांनी सहज मात केली. स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरने स्पर्धेचे आयोजन केले असून ओसीडब्ल्यू हे पुरस्कर्ते तर स्टेट बँक आॅफ इंडिया सहपुरस्कर्ते आहेत.
डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर लोकसत्ताला १२.३ षटकांत अवघ्या ८१ धावांत गुंडाळणाऱ्या पुण्यनगरीने ११.५ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. लोकसत्ताकडून प्रशांत क्षीरसागरने सर्वाधिक २३ धावा केल्या. पुण्यनगरीकडून श्रीधर हातागडेने २० धावांत चार गडी बाद केले. संजय ठाकरेने १६ धावा देत तीन बळी घेतले. पुण्यनगरीकडून श्रीकांत कोटगुळेने २० तसेच हातागडेने नाबाद १६ धावांचे योगदान दिले. अनिल अहिरकर यांच्याहस्ते हातागडेचा सामनावीर आणि रोशन भुसे याचा कॅच आॅफ द मॅच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आज बुधवारी लोकशाही वार्ताविरुद्ध लोकसत्ता हा सामना वसंत नगर मैदानावर सकाळी ९.३० पासून खेळविला जाईल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Victory relief to Pune