हा विजय पंतप्रधानांवरील जनतेच्या विश्वासामुळेच-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:34 IST2017-12-18T18:34:30+5:302017-12-18T18:34:55+5:30

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

This victory is due to the public's faith in the Prime Minister- Chief Minister Devendra Fadnavis | हा विजय पंतप्रधानांवरील जनतेच्या विश्वासामुळेच-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हा विजय पंतप्रधानांवरील जनतेच्या विश्वासामुळेच-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठळक मुद्देविधिमंडळ परिसरात भाजप आमदारांचा आनंदोत्सव

आॅनलाईन लोकमत
नागपूर : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे. देशातील जनता भाजपासोबत असून पंतप्रधानांचे विकासकारण देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दुपारी १.३० च्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धीमाध्यमांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. काही जणांनी नकारात्मक प्रचार चालविला होता. मोठ्या प्रमाणात गोष्टी पेरून रान उठविण्याचा प्रयत्न झाला. मात्र देशाच्या सामान्य माणसाचे भाग्य बदलविण्याची क्षमता नरेंद्र मोदींमध्येच आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही राज्यात भाजपला कौल दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, गुजरातमध्ये मागील खेपेच्या तुलनेत भाजपाच्या जागा जरी कमी झाल्या असल्या तरी विधिमंडळात मात्र भाजपच्या खेम्यात मात्र आनंदाचे वातावरण होते. विधिमंडळ परिसरात मिठाई वाटून आमदारांनी आनंद साजरा केला.

Web Title: This victory is due to the public's faith in the Prime Minister- Chief Minister Devendra Fadnavis