कारचालकाने घेतला महिलेचा बळी

By Admin | Updated: October 26, 2015 02:47 IST2015-10-26T02:47:51+5:302015-10-26T02:47:51+5:30

कारचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे अ‍ॅक्टीव्हावरील महिलेचा मृत्यू झाला. तर, तिचा पती गंभीर जखमी झाला. शनिवारी मध्यरात्री सेंट्रल एव्हेन्यूवर हा अपघात घडला.

The victim is the victim of the accident | कारचालकाने घेतला महिलेचा बळी

कारचालकाने घेतला महिलेचा बळी

नागपूर : कारचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे अ‍ॅक्टीव्हावरील महिलेचा मृत्यू झाला. तर, तिचा पती गंभीर जखमी झाला. शनिवारी मध्यरात्री सेंट्रल एव्हेन्यूवर हा अपघात घडला.
माँ उमिया सोसायटी, आंबेडकर चौक येथील राजेश लालजीभाई पंचमतिया (वय ४१) आणि त्यांची पत्नी हेतल (वय ३९) शनिवारी मध्यरात्री १२. ४५ वाजता अ‍ॅक्टीव्हाने घराकडे जात होते. आरोपी करण दिलीप ठक्कर (वय २९, रा. वर्धमाननगर) याने हलगर्जीपणे कार (एमएच ४९/ बी ०३०३) चालवून अ‍ॅक्टीव्हाला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे पंचमतिया पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी हेतल यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे राजेश पंचमतिया यांना जबर मानसिक धक्का बसला. माहिती कळताच लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी करण ठक्करविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: The victim is the victim of the accident