शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपुरात मद्यधुंद झायलोचालकाने घेतला पोलिसांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:38 PM

नागपूर : मद्यधुंद झायलो चालकाने जोरदार धडक दिल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. तर दुसरा पोलीस शिपायी गंभीर जखमी आहे.

ठळक मुद्देबीट मार्शल प्रदीप उईके ठारपोलीस अजय पाटील जखमीवाडीत झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मद्यधुंद झायलो चालकाने जोरदार धडक दिल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. तर दुसरा पोलीस शिपायी गंभीर जखमी आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला.प्रदीप गणपतराव उईके (वय ३४) असे मृताचे तर अजय प्रभाकर पाटील (वय ४२) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. हे दोघे वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी त्यांची नाईट ड्युटी होती. रात्री १२. ३० च्या सुमारास ते कर्तव्यावर होते. दुचाकीने प्रदीप आणि अजय आठवा मैलकडे गस्त करीत असताना मागून वेगात आलेल्या झायलो (एमएच ३१/ सीएस १८५३) चा आरोपी चालक हर्षदीपसिंग देवेंद्रसिंग आनंद (वय ३६, रा. शिवाजीनगर, हर्षविला, अंबाझरी) याने प्रदीप व अजयच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे खाली पडून दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी प्रदीप ऊईके यांना मृत घोषित केले.आरोपी होता मद्यधुंदकर्तव्यावरील पोलिसाचा बळी घेणारा आरोपी हर्षदीपसिंग आनंद हा दारूच्या नशेत होता. तो तशाही अवस्थेत बेदरकारपणे कार चालवित होता. त्याचमुळे हा अपघात घडला. दरम्यान, माहिती कळताच वाडी पोलिसांचा ताफा तसेच रात्रपाळीवरील पोलीस अधिकारी अपघातस्थळी तसेच रुग्णालयात पोहचले. आरोपी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून, या अपघातामुळे पोलीस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात