शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

नागपुरात निष्काळजी आॅटोचालकाने घेतला चिन्मयचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:12 AM

अत्यंत हुशार अन् मनमिळावू स्वभावाच्या चिन्मयचा बळी एका आॅटोचालकाच्या निष्काळजीपणामुळे गेला.

ठळक मुद्देअखेर मृतदेहच घरी परतलाहिस्लॉप कॉलेजजवळ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आई येतो ग कॉलेजमधून, असे म्हणत हसतच चिन्मय घरून निघाला. त्यावेळी साधारणत: सकाळचे ८ वाजले होते. १० ते १५मिनिटांनंतर चिन्मयची आई जया यांना फोन आला. चिन्मयला अपघात झाला... त्याला सीताबर्डीतील म्यूर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे... असे फोन करणाऱ्याने सांगितले. पायाखालची वाळू सरकवणारा हा फोन ऐकून जया यांनी चिन्मयचे आजोबा राजा नारायण भास्करे (वय ६९) यांना माहिती कळविली. काही वेळातच भास्करे परिवार आणि त्यांचे हितचिंतक म्यूरमध्ये पोहचले. चिन्मयची स्थिती गंभीर होती. भास्करे परिवाराने त्याला सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुपारी १२.२० च्या सुमारास चिन्मयचा मृत्यू झाला. अत्यंत हुशार अन् मनमिळावू स्वभावाच्या चिन्मयचा बळी एका आॅटोचालकाच्या निष्काळजीपणामुळे गेला.कल्याणी ट्रेडर्सचे संचालक आणि व्हेटरनरी डॉक्टर विनोद भास्करे यांचा चिन्मय (वय १६) हा मुलगा. त्याला कल्याणी (सीए) आणि गायत्री (डॉक्टर) या दोन बहिणी आहे. आई जया या कल्याणी ट्रेडर्सचे काम बघतात. अंबाझरीच्या टिळक नगरातील साफल्य या निवासस्थानी ते राहतात. सुखवस्तू कुटुंबातील चिन्मय हा सर्वांचाच लाडका. अत्यंत हुशार अन् मितभाषी. सिव्हील लाईन्समधील बी. पी. भवन्स विद्यामंदिरचा तो अकरावीचा विद्यार्थी होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी चिन्मय आपल्या अ‍ॅक्टीव्हाने (एमएच ३१/ ईझेड ८१२९) कॉलेजला जायला निघाला. सीताबर्डीतील हिस्लॉप कॉलेज चौकात त्याला एका भरधाव आॅटोचालकाने जोरदार धडक दिली. त्यामुळे चिन्मय गंभीर जखमी झाला. या मार्गाने जाणाऱ्यांनी पोलिसांना कळवून त्याला म्यूर मेमोरियलमध्ये दाखल केले. माहिती कळताच सीताबर्डीचे पोलीस पोहचले. त्यांनी जखमी चिन्मयची ओळख पटविल्यानंतर त्याच्या आईच्या मोबाईलवर संपर्क केला. भास्करे परिवाराला चिन्मयचा अपघात झाल्याचे कळाल्याने जबर धक्का बसला. ते धावतपळतच म्यूर हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी तेथून चिन्मयला सिम्समध्ये हलविले. मात्र, फायदा झाला नाही. दुपारी १२.२० च्या सुमारास डॉक्टरांनी चिन्मयला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने भास्करे परिवारावर जबर मानसिक आघात झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघात