उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू २४ रोजी नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 20:59 IST2018-02-06T20:53:26+5:302018-02-06T20:59:58+5:30
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सायंकाळी ६.३५ वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होणार आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू २४ रोजी नागपुरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सायंकाळी ६.३५ वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होणार आहे. उपराष्ट्रपती विमानतळावर स्वागताचा स्वीकार करुन राजभवनसाठी प्रयाण करतील व राजभवन येथे त्यांचा मुक्काम राहील.
रविवार, २५ फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती सकाळी १०.१० वाजता नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील. सकाळी ११.३५ वाजता उपराष्ट्रपती सेवाग्राम येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी येथून हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. सकाळी ११.१५ ते ११.३० वाजेपर्यंत बापूकुटीला भेट देतील. त्यानंतर सकाळी ११.४० वाजता महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स येथे आयोजित इंटरनॅशनल गांधी अवॉर्ड कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दुपारी १२.३० वाजता महात्मा गांधी इस्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या हॉस्पिटल व नव्याने बांधण्यात आलेल्या आॅपरेशन थिएटरला भेट देतील. येथील कार्यक्रमानंतर दुपारी ३ वाजता सेवाग्राम येथील हेलिपॅडकडे प्रयाण करतील. दुपारी ३.३५ वाजता सेवाग्राम येथून हेलिकॉप्टरने नागपूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर दुपारी ३.५० वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.