कामठी न.प.च्या उपाध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:40+5:302021-01-13T04:19:40+5:30

भाजपचे प्रतीक पडोळे यांचा पराभव कामठी : कामठी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. तीत काँग्रेसचे अहफाज अहमद यांचा ...

As the Vice President of Kamathi NP | कामठी न.प.च्या उपाध्यक्षपदी

कामठी न.प.च्या उपाध्यक्षपदी

भाजपचे प्रतीक पडोळे यांचा पराभव

कामठी : कामठी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. तीत काँग्रेसचे अहफाज अहमद यांचा विजय झाला. अहमद यांना २० तर भाजप-बरिएम युतीचे उमेदवार प्रतीक पडोळे यांना १० मते मिळाली. दोन नगरसेवक सभेला गैरहजर राहिले.

२०१७ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे मोहम्मद शहाजहा शफाहत अन्सारी हे थेट मतदारांमधून नगराध्यक्षपदी निवडून आले होते. या निवडणुकीत काँग्रेसला (१६), भाजप (८), बहुजन रिपब्लिकन एकता मंच (२), एमआयएम, बसपा आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक तर ३ अपक्ष नगरसेवक विजयी झाले होते. आज झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून अहफाज अहमद तर भाजप-बरिएमकडून प्रतीक पडोळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज सादर केले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास पीठासीन अधिकारी मोहम्मद शाहजहा अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. तीत भाजपचे नगरसेवक संजय कनोजिया व लालसिंग यादव यांनी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली. पिठासीन अधिकारी मोहम्मद शाहजहा अन्सारी यांनी हात उंचावून मतदान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या निवडणुकीत अहफाज अहमद यांना २० मते मिळाली. त्यात एमआयएमच्या नगरसेविका शहनाज अंजुम अतिकूर रहेमान, बसपाच्या रमा गजभिये व अपक्ष नगरसेवक मोहम्मद अक्रम, रघुवीर मेश्राम यांनी मतदान केले. भाजपचे उमेदवार प्रतीक पडोळे यांना भाजपच्या आठ, बरिएम, शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने मतदान केले. पडोळे यांना १० मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहफाज अहमद यांना विजयी घोषित केले. सभेला बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नगरसेविका सरोज रंगारी, अपक्ष नगरसेविका चंपा वाधवानी गैरहजर होत्या. निवडणूक प्रक्रियेचे काम मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी पार पाडले.

Web Title: As the Vice President of Kamathi NP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.