शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

समृद्धीच्या मार्गे एसटी बस शिर्डीत साईच्या दारी; १५ डिसेंबरपासून विशेष सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 19:21 IST

गणेशपेठ बसस्थानकावरून रोज रात्री ९ वाजता ही बस निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता ती शिर्डीत दाखल होईल.

नरेश डोंगरे

नागपूर - दळणवळणाचा मार्ग समृद्ध करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर धावण्यासाठी एसटी बस सज्ज आहे. गुरुवारी १५ डिसेंबरपासून एसटीची विशेष प्रवासी बस समृद्धी मार्गे रोज नागपूरहूनशिर्डीला जाणार आहे.

रविवारी या महामार्गाचे लोकार्पण झाले आणि लगेच अनेकांनी या मार्गाचा वापरही सुरू केला. खासगी प्रवासी बसच्या संचालकांना तर या महामार्गामुळे वेगळाच आनंद झाला आहे. कारण जेथे ७ ते ९ तास लागायचे ते नागपूर शिर्डी अंतर केवळ ५ तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांचे तीन तासांचा डिझेल अन् त्यापोटी होणारा हजारोंचा खर्च आता कमी होईल, अर्थात हा खर्च नफा म्हणून ट्रॅव्हल्स संचालकांच्या खिशात जमा होणार आहे. वेळ वाचणार म्हणून प्रवासीही ट्रॅव्हल्सकडे धाव घेणार आहे. हा एकूणच सगळा जमा खर्च अन् लाभ लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळानेही आपली बससेवा समृद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी बससेवा सुरू होत आहे.

गणेशपेठ बसस्थानकावरून रोज रात्री ९ वाजता ही बस निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता ती शिर्डीत दाखल होईल. अशाच प्रकारे दररोज रात्री ९ वाजता शिर्डीतून एक बस निघेला आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता नागपूरला पोहचेल.

बसचे प्रवासभाडे १३०० रुपये आहे. या बसमध्ये ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशाला मोफत प्रवासाची तर ६५पेक्षा जास्त वय असलेल्यांना तिकिटाची अर्धीच रक्कम द्यावी लागेल.

आरामदायक प्रवास सेवा

एसटीची ही बस आरामदायक, स्लिपरकोच असणार आहे. अर्थात जेवण करून रात्री बसमध्ये बसले की छान झोप घेऊन प्रवाशांना भल्या सकाळी शिर्डीत पोहचता येईल. रस्त्यात ती थांबणार नाही त्यामुळे प्रवशांना कसलाही व्यत्यय येणार नाही. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरshirdiशिर्डी