ज्येष्ठ लेखिका डॉ. सुनीती देव यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 21:53 IST2023-05-02T21:52:35+5:302023-05-02T21:53:44+5:30
Nagpur News ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनीती देव यांचे मंगळवारी निधन झाले.

ज्येष्ठ लेखिका डॉ. सुनीती देव यांचे निधन
नागपूर: ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनीती देव यांचे मंगळवारी आजारपणामुळे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा अभिजित, सून वृषाली देशपांडे, नात आणि आप्तपरिवार आहे.
डॉ. देव या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. त्यांनी अमरावती येथील तत्कालिन विदर्भ महाविद्यालय येथे सेवा दिली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागप्रमुख म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. डॉ. देव यांचा नागपूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय वावर होता. नागपूर शहरातील वाहतूक नियंत्रणाबाबत काम करणाऱ्या जनआक्रोश संघटनेच्या त्या सदस्य होत्या. याशिवाय, आजच्या सुधारक या नियतकालिकाच्या संपादक मंडळातही त्या होत्या. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातही त्यांता सहभाग होता. डॉ. सुनीती देव या सामाजिक विषयांबद्दल अत्यंत जागरुक होत्या. या विषयावर त्यांनी सातत्याने लेखन केले होते.