प्राणघातक हल्ल्यात भाजी विक्रेता बापलेक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST2021-03-05T04:07:26+5:302021-03-05T04:07:26+5:30

नागपूर : आजूबाजूला भाजीचा हातठेला लावणाऱ्या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्या भाजी विक्रेत्या बापलेकावर सब्बलने हल्ला चढवला. यात दोघे ...

Vegetable seller Baplek Gambhir in deadly attack | प्राणघातक हल्ल्यात भाजी विक्रेता बापलेक गंभीर

प्राणघातक हल्ल्यात भाजी विक्रेता बापलेक गंभीर

नागपूर : आजूबाजूला भाजीचा हातठेला लावणाऱ्या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्या भाजी विक्रेत्या बापलेकावर सब्बलने हल्ला चढवला. यात दोघे जबर जखमी झाले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. शेख रफिक शेख वकील (वय ३६) आणि शेख वकील (वय ६५) अशी जखमी बापलेकाची नावे आहेत.

आरोपी शेख रफिक शेख रशिद आणि शेख रफिक शेख वकील हे दोघे नंदनवनमधील शेषनगरात आजूबाजूला राहतात. ते दोघेही भाजीचा हातठेला लावतात. एकमेकांशेजारी हात ठेला लावण्यावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी या वादाला पुन्हा तोंड फुटले. त्यानंतर आरोपीने शेख रफिक आणि त्यांचे वडील शेख वकील या दोघांवर सब्बलने हल्ला चढवला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपींना कसेबसे आवरले. माहिती मिळाल्यानंतर नंदनवन पोलिसांनी जखमींचे बयाण नोंदवून आरोपी शेख रफिक शेख रशिद याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.

---

Web Title: Vegetable seller Baplek Gambhir in deadly attack