शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजीपाला व फळांचा तुटवडा : कळमना फळ बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 21:12 IST

कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत नसल्याने अडतिया असोसिएशनने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभाजी बाजार शुक्रवारपासून बंद होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत नसल्याने अडतिया असोसिएशनने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फळ बाजार बुधवार आणि भाजीपाला बाजार शुक्रवारपासून ३१ मार्चपर्यंत ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे.या पार्श्वभूमीवर शहरात फळे आणि भाज्यांचा तुटवडा होणार असून गृहिणींना घरगुती भाज्यांवर भर द्यावा लागणार आहे. विहिरगाव येथील शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, भाज्या तोडणीला आल्यानंतर शेतात ठेवता येत नाही. त्याची विक्री करावीच लागते. अशा स्थितीत सोमवारपर्यंत रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री केली. पण मंगळवारी पोलिसांनी हाकलून लावले. विक्री करणार कुठे हा प्रश्न आहे. त्यामुळे भाज्या घरीच पडून आहेत. कोरोनामुळे आर्थिक फटका बसला आहे.कळमना फळ बाजार अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, देशाच्या अन्य राज्यातून रविवारपर्यंत फळांची आवक होती. पण शहरात कर्फ्यू असल्याने फळांची विक्री झाली नाही. त्यामुळे बहुतांश फळे विक्रीविना पडून आहेत. फळे नाशवंत असल्याने साठवणूक करता येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना कळमन्यात फळे आणण्यास मनाई केली आहे. मंगळवारी असलेली फळे विकून बुधवारपासून दुकाने बंद ठेवणार आहे, असा निर्णय अडतिया असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे शहरात ३१ मार्चपर्यंत फळे मिळणार नाहीत.कळमन्यातील युवा सब्जी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. पण शहरात कर्फ्यू असल्याने किरकोळ विक्रेते कळमन्यात भाज्या खरेदीसाठी येत नाहीत; शिवाय शहरातील आठवडी बाजारही बंद झाले आहेत. त्यामुळे दररोज भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात शिल्लक असतात. अन्य राज्यातून येणाऱ्या ट्रकची वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे कळमन्यात भाज्या विक्रीसाठी आणू नये, असे स्थानिक शेतकऱ्यांना सांगितले आहे. शुक्रवारी बाजाराला सुटी असते. त्यामुळे शनिवारपासून ३१ मार्चपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. भाज्या मिळत नसल्याने लोकांमध्ये रोष असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारvegetableभाज्या