‘काेर्ट’चा नायक वीरा साथीदार काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:07 IST2021-04-14T04:07:37+5:302021-04-14T04:07:37+5:30

१९ मार्च राेजी त्यांनी काेराेनाची लस घेतली हाेती़ त्यानंतर १० दिवसांनी ते विषाणूने संक्रमित झाले़ त्यांच्यावर पाच ...

Veera, the protagonist of 'Kaert', is a companion behind the curtain of time | ‘काेर्ट’चा नायक वीरा साथीदार काळाच्या पडद्याआड

‘काेर्ट’चा नायक वीरा साथीदार काळाच्या पडद्याआड

१९ मार्च राेजी त्यांनी काेराेनाची लस घेतली हाेती़ त्यानंतर १० दिवसांनी ते विषाणूने संक्रमित झाले़ त्यांच्यावर पाच दिवसापासून एम्समध्ये उपचार सुरू हाेते़ वीरा साथीदार यांनी अत्यंत संघर्षात जीवन काढले़ वर्धा जिल्ह्यातील सेलू हे त्यांचे मूळ गाव़ वीरा यांचे वडील नागपूर येथील रेल्वे स्थानकावर हमालीचे काम करायचे तर आई बांधकाम मजूर म्हणून राबायची. कामाच्या शाेधात सुरुवातीला बुटीबाेरीजवळ परसाेडी या गावी त्यांनी मुक्काम ठाेकला़ येथे कंपन्यांमध्ये मजुरी केली़ पुढे त्यांनी नागपूर गाठले आणि रामेश्वरीजवळच्या जाेगीनगर येथे बस्तान बसविले़ उदरनिर्वाहासाठी त्यांनी कधी सायकल रिक्षा चालविला, मिलमध्ये काम केले, डफली वाजविली, खदानीमध्ये मजुरीचेही काम केले़ पुढे पत्रकार म्हणूनही कार्य केले़ ‘विद्राेही’ या मासिकाचे त्यांनी संपादन केले़ ते गीतकारही हाेते़ आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी लिहिली व गायली आहेत. संवेदनशील स्वभावामुळे या काळात त्यांचा आंबेडकरी चळवळीशी संबंध आला़ त्यांच्यावर डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा हाेता, तसे ते मार्क्सवादाचेही पुरस्कर्ते हाेते़ दलित पँथरचे ते सक्रिय कार्यकर्ते हाेते़ पारधी समाजाच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदाेलनाचे नेतृत्व केले़ भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर आणि न्यायालयात लढे दिले़ काेर्ट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्यानंतर त्यांच्या नावाला वलय प्राप्त झाले़ यानंतर आणखी तीन चित्रपटाचे शुटींग चालले असल्याचे वीरा यांनी यापूर्वी सांगितले हाेते़ गेल्या वर्षीपासून काेराेनामुळे ते रखडले हाेते़ ते पडद्यावर येण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा जयभीम घेतला़

अभिनेता नाही कार्यकर्ता म्हणवणे आवडते

चैतन्य ताम्हाणे यांच्या काेर्ट चित्रपटात पहिल्यांदाच त्यांनी अभिनय केला़ दिग्दर्शक ताम्हाणे यांनी २०० लाेकांच्या ऑडिशन घेतल्यानंतर वीरा यांना प्रमुख भूमिका करण्याची विनंती केली़ त्यांनीही ती स्वीकारली़ या चित्रपटाला २०१७ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला़ याशिवाय १८ च्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले़ ऑस्करसाठी नामांकन मिळाले तेव्हा ते लाेकमतमध्ये आले हाेते़ तेव्हा लाेकमत एडिटाेरियल बाेर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी भेट घेतली हाेती़ प्रसिद्धी मिळूनही हा सच्चा कार्यकर्ता जमिनीवरच हाेता़ अभिनेता म्हणवून घेण्यापेक्षा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणे अधिक आवडत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली हाेती़

म्हणून बदलले नाव

त्यांचे मूळ नाव विजय वैरागडे असे हाेते़ मात्र आडनावावरून लाेक त्यांना तेली, कुणबी की बाैद्ध असा प्रश्न करून जात गृहित धरायचे़ ते त्यांना आवडत नसे़ त्यांनी स्वत:चे वीरा साथीदार असे नामकरण केले आणि पुढे याच नावाने ओळखलेही गेले़

अनेक वर्षांतून मिळतात अशी माणसे : वाघमारे

वीरा साथीदारांसारखे सहकारी सहजासहजी मिळत नाही व घडतही नाही़ अनेक वर्षांचा संघर्ष केल्यानंतर असा कार्यकर्ता घडत असल्याची भावना संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे यांनी व्यक्त केली़ काेर्ट चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भटक्या विमुक्तांसाठी संघटनेने केलेल्या आंदाेलनात ताे उभा झाला हाेता़ ताे असामान्य हाेता़ त्याच्या जाण्याने खूप माेठी हानी झाल्याची दु:खद भावना वाघमारे यांनी व्यक्त केली़

Web Title: Veera, the protagonist of 'Kaert', is a companion behind the curtain of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.