तिजोरी रिकामी, पण बजेट जम्बो
By Admin | Updated: July 1, 2014 01:51 IST2014-07-01T01:01:26+5:302014-07-01T01:51:49+5:30
महापालिकेचा २०१४- १५ चा अर्थसंकल्प उद्या, मंगळवारी सादर होणार आहे. मनपाची तिजोरी रिकामी असली तरी बजेट मात्र जम्बो राहणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी

तिजोरी रिकामी, पण बजेट जम्बो
आज मनपाचा अर्थसंकल्प : निवडणूक घोषणांचा पाऊस
नागपूर : महापालिकेचा २०१४- १५ चा अर्थसंकल्प उद्या, मंगळवारी सादर होणार आहे. मनपाची तिजोरी रिकामी असली तरी बजेट मात्र जम्बो राहणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १५५० कोटींचे बजेट सादर करण्याची तयारी चालविली आहे.
संपलेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला फक्त ८०१ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. एलबीटीमुळे आर्थिक कंबर मोडली आहे. उत्पन्नवाढीचे दुसरे कोणते मोठे स्रोत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा केल्या जातील. अशाच या सर्व घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडे पैसा कुठून येईल, असा प्रश्न आहे. निवडणूक तोंडावर असल्यामुळे बोरकर यांना जनतेवर कुठलाही बोझा टाकता येणार नाही. त्यामुळे करात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षांचे बजेट भाषणही जम्बो असेल. सुमारे ४० पानांचे भाषण असू शकते. (प्रतिनिधी)
उत्पन्न असे वाढू शकते
-मालमत्ता कर वसुलीपासून २५० कोटी येऊ शकतात. यासाठी कर वसुली व मूल्यांकन पद्धत बदलावी लागेल.
- बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळांचा व्यावसायिक उपयोग केला तर उत्पन्न वाढू शकते.
-मंगळवारी शॉपिंग मॉल वगळता महापालिकतर्फे शहरात दुसरा शॉपिंग मॉल उभारण्यात आला नाही. पाच शॉपिंग मॉल प्रस्तावित आहेत. दानागंज व जरीपटकाचे काम रखडले आहे. हे देखील उत्पन्नाचे चांगले साधन आहे.
-शहरातील ६ दैनिक बाजार, २३ अनधिकृत साप्ताहिक तसेच २० दैनिक बाजार अनधिकृत आहेत. नवे बाजार विकसित केले तर बाजार शुल्कापासून महापालिकेला उत्पन्न होईल.
-आरेंजसिटी स्ट्रीट हा ४५० कोटींचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प साकार झाला तर महापालिकेला चांगले उत्पन्न होईल.
अर्थसंकल्पात काय असणार ?
-बाल्या बोरकर हे पूर्व नागपुरातील आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात पूर्व नागपूर डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा होऊ शकतात. सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, हॉस्पिटलची घोषणा होऊ शकते.
- पारडी उड्डाणपुलाचे काम यावर्षी सुरू होणार आहे. त्यासाठी तरतूद केली जाऊ शकते.
-नागनदी, पिवळी नदी सफाई, उद्यानांचा विकास यासाठी घोषणा होईल. अंबाझरी येथे मोठा ध्वज उभारला जाईल. एस्सल वर्ल्डच्या धर्तीवर वॉटर पार्क तयरा करण्याची योजना आहे.
-गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा होतील. महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून एखादी नवी योजना मांडली जाऊ शकते.
-बीओटी व पीपीपी तत्त्वावर काही योजना मांडल्या जाण्याची शक्यता आहे.