शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये दारूड्यांचा धिंगाणा; सामानाची तोडफोड, दारूच्या बाटल्या फेकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 13:13 IST

नागपुरातील व्हीआयपी मार्गावर असलेल्या वनामती समोरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बिशप कॉटन स्कूलमध्ये काही अज्ञातांनी शाळेच्या आत शिरून दारूच्या बाटल्या फेकून शाळेची तोडफोड केली.

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस गुंडांचा हैदोस वाढत चालला आहे. तर, आता शहरातील वर्दळीच्यी ठिकाणी असलेल्या शाळेत काही अज्ञातांनी घुसखोरी करत  शाळेतील वस्तूंची तोडफोड करून  दारूच्या बाटल्या फेकल्याचे केल्याचे समोर आले आहे. शाळेला दोन दिवस सुटी होती दरम्यान ही घटना घडली आहे.

नागपुरातील व्हीआयपी मार्गावर असलेल्या वनामती समोरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बिशप कॉटन स्कूलमध्ये काही अज्ञातांनी शाळेच्या आत शिरून दारूच्या बाटल्या फेकून शाळेची तोडफोड केली. गेल्या काही वर्षात या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, त्यावर आळा बसत नसल्याची शोकांतिका आहे.  या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेली दोन दिवस शाळेला सुट्टी होती. सुटी असल्यानं दारूड्यांनी शाळेला या ठिकाणी आपला अड्डा बनविला. यावेळी शनिवार व रविवारी समाजकंटक शाळेच्या आत शिरले व त्यांनी शाळेतील मालमत्तेची तोडफोड केली व दारूच्या बाटल्याही फेकल्या याप्रकरणी शाळेच्या प्राचार्य सोनिया सिंग यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :SchoolशाळाCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर