शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वनविभागाचा प्रताप : लाचखोराचा सन्मान, तक्रारकर्त्याचा अवमान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 7:44 PM

वनविभागातील भंडारा वनपरिक्षेत्राचे विभागीय वनअधिकारी योगेश वाघाये यांना दोन लाख रुपयांची लाच घेण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली. अटक केल्यानंतरही वाघाये आपल्या कामावर रुजू झाले आहे. मात्र या प्रकरणातील तक्रारकर्ते लागवड अधिकारी यांना प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकाने तत्काळ निलंबित केले.

ठळक मुद्देविभागीय वन अधिकाऱ्याकडे निलंबनाची मागणी

आॅनलाईन लोकमत

नागपूर : वनविभागातील भंडारा वनपरिक्षेत्राचे विभागीय वनअधिकारी योगेश वाघाये यांना दोन लाख रुपयांची लाच घेण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली. अटक केल्यानंतरही वाघाये आपल्या कामावर रुजू झाले आहे. मात्र या प्रकरणातील तक्रारकर्ते लागवड अधिकारी यांना प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकाने तत्काळ निलंबित केले.विभागीय वनअधिकारी योगेश वाघाये यांना १३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांनी अटक केली होती. या प्रकरणात वाघाये यांनी सामाजिक वनीकरणाचे लागवड अधिकारी यांच्याकडून दोन लाख रुपयांची मागणी केली होती. लागवड अधिकाऱ्यावर आरोप होता की, सामाजिक वनीकरणाच्या ३४,५१,००० रुपयांच्या कामापैकी ७,०१,५२५ रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी योगेश वाघाये याने लागवड अधिकाऱ्याकडून लाच मागितली होती. परंतु लागवड अधिकाऱ्याने लाच देण्यास नकार दिल्याने, त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे सापळा रचून वाघाये याला अटक करून पोलीस स्टेशन भंडारा येथील कोठडीत ठेवण्यात आले. लाचलुचपत विभागाने भंडारा विशेष न्यायालयात त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर करून, १५ हजार रुपयांच्या कॅश सेक्युरिटीवर जामिनावर सोडून दिले. या प्रकरणात अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो भंडारा यांनी दिलेल्या अहवालात प्रधान सचिव, महसूल व वन यांना योगेश वाघाये यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी विनंती केली. परंतु वनविभागाने योगेश वाघाये यांना निलंबित केले नाही. तेज पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहे.तसेच तक्रारकर्ता लागवड अधिकारी यांना सात लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावर विभागीय चौकशी न करता निलंबित केले. योगेश वाघाये यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे विभागाने त्यांचे निलंबिन टाळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान पीडित लागवड अधिकाऱ्याने विभागीय वनअधिकाऱ्याकडे   निलंबिनाची मागणी केली आहे.