मते, भांगडिया यांचा भाजपमध्ये प्रवेश

By Admin | Updated: August 18, 2014 00:31 IST2014-08-18T00:31:47+5:302014-08-18T00:31:47+5:30

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाल येथील निवासस्थानी रविवारी आयोजित कार्यक्र मात माजी आमदार मोहन मते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.

Vajpayee's entry into BJP | मते, भांगडिया यांचा भाजपमध्ये प्रवेश

मते, भांगडिया यांचा भाजपमध्ये प्रवेश

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाल येथील निवासस्थानी रविवारी आयोजित कार्यक्र मात माजी आमदार मोहन मते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, भाजपचे शहर अध्यक्ष तथा आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मनपातील सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, सुधाकर कोहळे, डॉ. छोटू भोयर, रमेश शिंगारे आदी व्यासपीठावर होते.
मोहन मते हे मला लहान भावासारखे आहेत. त्यांच्या प्रवेशाने पक्ष अधिक बळकट होईल. सर्वांनी मिळून शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागांवर विजय मिळवू ,असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
मते यांच्यासह बंटी भांगडिया, मनोज चाफले, नितीन चौधरी, अनिल पांडे, पंकज काळबांडे, हुसेन अली, नाना असलम, सुनील मानेकर, समीर चट्टे, बाबाभाई, संजय बोरकर, मुन्ना वाघमारे, बलविंदरसिंग भामरा, सहदेव गोसावी, रवी बोरकर, कमल मेश्राम, बबलुभाई पठान, निलेश तिजारे, गणेश इंगोले, विजय क्षीरसागर, श्याम वाडीघरे, अल्तीया गुप्ता, माधवी बन्सोड, स्मिता माटे व रोजमेरी फ्रांसिस आदींनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.मागील काही वर्षात पक्षाबाहेर असलो तरी विचाराने पक्षासोबतच होतो.
यापुढे पक्षसंघटनेसाठी काम करणार असल्याचे मोहन मते म्हणाले. मते यांच्यावर लवकरच पक्षाची महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Vajpayee's entry into BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.