शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वडेट्टीवार म्हणतात, पटोले हटाव मोहिमेत मी नाही !

By कमलेश वानखेडे | Updated: November 29, 2024 16:03 IST

Nagpur : फडणवीस यांनी विदर्भाला न्याय द्यावा

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्यासाठी कोणतिही मोहीम राबविण्याची आवश्यकता नाही. अशा कुठल्याही मोहिमेत आपण सहभागी नाही. काही चुका होत असतात. राज्यात मोठा पराजय होत असेल तर मंथन होणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जय पराजय होत असतो. संयम महत्वाचा असतो. आता १६ ते १६० कसे होतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्याच्या तिकीटासाठी हायकमांडला शिफारस करण्याचा अधिकार राज्याच्या नेतृत्वाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहे, यात आनंद आहे. त्यांना कुबड्यांचा गरज नाही. उलट कुबड्या आता फडणवीसांवर अवलंबून आहेत. त्यांना कोणी थांबवु शकत नाही. फडणवीस हे विदर्भाचं लेकरू आहे. त्यांच्याकडून विदर्भाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. मध्यंतरी त्यांच्यावर बदला घेण्याचे राजकारण करणारी व्यक्ती, असा ठपका होता. तो ठपका यावेळी पुसून निघेल अशी अपेक्षा आहे. विचारधारेची लढाई असावी, वैयक्तिक वैर नसावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शिंदे-पवार यांना फडणविसांच्या आशिर्वादाने राहावे लागणारएकनाथ शिंदे यांनी आता उपमुख्यमंत्री पद नाही घेतो तर दुसरा चेहरा तयार आहे. त्यामुळे मिळेल ते घेणे ही त्यांची मजबुरी आहे. पक्ष संभाळण्यासाठी त्यांना घ्यावंच लागेल. मुख्यमंत्री राहणाऱ्यानी मंत्री पद घेतले, त्याशिवाय पर्याय नाही. शिंदे-पवार यांना आता मोदी-फडणवीस यांच्या आशिर्वादाने राहावे लागणार. काही दिले नाही तर चुपचाप राहावे लागेल, असे चिमटे वडेट्टीवार यांनी काढले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती