कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलवर शासनाने गंभीर कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. काही चुका झाल्या असतील तर ते सुद्धा दुरुस्त करण्याकरिता यांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रमुख नेते आहेत, त्यांनी अहवाल तपासून घेतला पाहिजे. विजय वडेट्टीवार नवीन नवीन पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे ते नाना पटोले यांच्यासोबत स्पर्धा करत आहेत, असा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या जिल्ह्यात यात्रा काढली तर तेच पुरे आहे, असा चिमटाही त्यांनी घेतला.
नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, गुरुवारी अमरावतीमध्ये आणि शुक्रवारी नागपुरात आपण अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावून तातडीने सर्वेक्षण करावे व अहवाल सरकारकडे सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
डीपीसी निधी वाटपासाठी महायुतीची किमिटीमहायुतीचे तिन्ही नेते बसून डीपीसी निधी वाटप कसा करायचा, पालकमंत्री मंत्र्यांचे अधिकार, तालुकास्तरीय समिती कसे वाटप करावे, विरोधी पक्षाचे लोकांनाही तिथे घ्यावा लागते. जिल्हास्तरीय ३७ समित्यांचे वाटप कसे असावे याचा फाम्युर्ला ठरवलेला आहे.
अमित शाह यांचा रायगड दौरा राजकीय नाहीअमित शहा यांचा राजकीय दौरा नसून ते रायगडावर कार्यक्रमासाठी जात आहेत. महायुतीच्या पक्षातील एका नेत्याने निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारले. यात काही वावगं नाही. ते संस्कृती म्हणून जात आहे. राजकीय भांडवल करू नये, असेही बावनकुळे म्हणाले.
रेती माफियांसोबत हात मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयारसरकारने वेगवेगळ्या माध्यमातून वाळू घाट कंट्रोल करण्याची योजना केली आहे. रेती माफियांसोबत हात मिळवणी करणाऱ्या दहा ते पंधरा अधिकाऱ्यांची यादी आली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे म्हणाले, पर्यावरणाची परवानगी नसताना भंडाऱ्यात रेतीघाट सुरू होते. त्यांना विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी कारवाईची गरज होती पण झाली नाही. चंद्रपूर, भंडारा, जालना, जाफराबाद यासह अनेक ठिकाणी तक्रारी आल्या आहेत. राहुरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथूनही तक्रारी आहेत. सरकार स्वत:हून कारवाई करत आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.पोलीस ठाणे वाढविण्याची गरजनागपुरातील हिंसाचार घटनेनंतर मुख्यमंत्री यांनी गृह विभागाचा आढावा घेतला.सुरक्षेचा आढावा घेतला. नागपूर जिल्ह्यात चार ते पाच पोलीस ठाणे वाढवण्याची गरज आहे. तर शहरात पाच पोलीस ठाणे वाढवण्याची गरज आहे अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, कामठी हा वेगळा सहा नंबरचा झोन तयार करण्याची गरज आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणची पुनर्रचना करून काही पोलीस ठाणे वाढवण्याची गरज बावनकुळे यांनी व्यक्त केली.