९६ हजार गोवंशीय जनावरांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 21:37 IST2022-09-23T21:34:59+5:302022-09-23T21:37:08+5:30
Nagpur News प्रशासनाने लम्पी या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरणाचाही वेग वाढविला असून जिल्ह्यात ९६ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

९६ हजार गोवंशीय जनावरांचे लसीकरण
ठळक मुद्दे ३ जनावरांचा मृत्यूबाधित २८२, १३० ठणठणीत
नागपूर : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता लम्पी आजाराने दस्तक दिली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात नव्याने ८२ जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत बाधित जनावरांची संख्या २८२ वर पोहचली आहे. तर प्रशासनाने या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरणाचाही वेग वाढविला असून जिल्ह्यात ९६ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
१३० जनावरांनी या आजारावर यशस्वीरीत्या मातही केली आहे. आतापर्यंत ३ जनावरांच्या मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्याला आजपर्यंत १.६० लाख लस उपलब्ध झाल्या असून, आणखी १.५० लाख लसींची मागणी करण्यात आली आहे.