३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:31+5:302021-06-20T04:07:31+5:30

- प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवात कुही : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची ...

Vaccination of citizens in the age group of 30 to 44 years | ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

- प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवात

कुही : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम सुरु केली आहे. शनिवारी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली.

ग्रामीण भागात प्रत्येक केंद्रावर हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. परंतू मध्यल्या काळात याला ब्रेक लागला होता. केंद्र सरकारने आता राज्य सरकारला वयोगट ठरविण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने ३० ते ४४ गट निश्चित केला असून शनिवारपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १० ग्रामीण रुग्णालय व २ उपजिल्हा रुग्णालय आहे. या सर्व ठिकाणी लसीकरणाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय निकम यांनी दिली.

Web Title: Vaccination of citizens in the age group of 30 to 44 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.