४५ वर्षांवरील नागरिकांचे आजही लसीकरण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST2021-05-11T04:08:33+5:302021-05-11T04:08:33+5:30

१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ६ केंद्रांवर लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराकरिता लसीचा ...

Vaccination of citizens above 45 years is still closed today | ४५ वर्षांवरील नागरिकांचे आजही लसीकरण बंद

४५ वर्षांवरील नागरिकांचे आजही लसीकरण बंद

१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ६ केंद्रांवर लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराकरिता लसीचा साठा प्राप्त न झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण मंगळवारी नाही. ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी मंगळवारी ६ केंद्रे सुरू राहतील. यामध्ये कोव्हॅक्सिन लसीकरण स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, छाप्रू सर्वोदय मंडळ हॉल, छाप्रूनगर सेंट्रल एव्हेन्यू, राजकुमार गुप्ता समाजभवन, बजेरिया, विरंगुळा केंद्र, जयहिंद सोसायटी, ठकळ ग्राउंडजवळ, मनीषनगर, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येईल.

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाइन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे, त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination of citizens above 45 years is still closed today