जिल्ह्यात आजपासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST2021-06-23T04:07:08+5:302021-06-23T04:07:08+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्यापासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. आजपासून ...

जिल्ह्यात आजपासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण ()
नागपूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्यापासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
रात्री उशिरा या संदर्भातील निर्णय जाहीर झाले असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने या उपक्रमासाठी सज्ज व्हावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत. तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला महाराष्ट्रात सुरुवात झाली होती.परंतु मध्यंतरी लसीकरण थांबविण्यात आले होते. केंद्र शासनाने आता राज्य सरकारला वयोगट ठरविण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात प्रथम राज्य सरकारने ३३ ते ४४ गट निश्चित केला होता. मात्र उद्यापासून १८ वर्षावरील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १० ग्रामीण रुग्णालय व २ उपजिल्हा रुग्णालय आहे. या सर्व ठिकाणी उद्यापासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे.