वाडी येथील लसीकरण केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:31+5:302021-04-11T04:08:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : काेराेना संक्रमण वाढत असताना ग्रामीण भागात काेराेना लसीकरणाने हळूहळू वेग घ्यायला सुरुवात केली हाेती. ...

वाडी येथील लसीकरण केंद्र बंद
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : काेराेना संक्रमण वाढत असताना ग्रामीण भागात काेराेना लसीकरणाने हळूहळू वेग घ्यायला सुरुवात केली हाेती. त्यातच लसींचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाल्याने वाडी येथील केंद्रावर शनिवारी (दि. १०) लसीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना केंद्रातून परतीचा रस्ता धरावा लागला.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरुवातीला ६० वर्षावरील आणि नंतर ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या लसीकरणाला वेग यावा म्हणून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. शिवाय, नागपरिकांच्या मनातील लसीकरणाबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृतीही करायला सुरुवात करण्यात आली. परिणामी, लसीकरण माेहिमेने वेग घेताच लसींचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे वाडी येथे ही माेहीम तात्पुरती थांबल्यागत झाली आहे.
वाडी शहरात ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या १३ हजाराच्या वर आहे. यातील ५,६५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लस हे प्रभावी साधन आहे, हे नागरिकांना आता पटायला लागले असतानाही तुटवडा निर्माण झाल्याने घाेळ झाला आहे. सध्या लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. लस लवकरच उपलब्ध होईल. ती उपलब्ध हाेताच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. सचिन हेमके यांनी दिली.