आर्य समाजातर्फे लसीकरण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST2021-05-26T04:09:52+5:302021-05-26T04:09:52+5:30

नागपूर : जरीपटका येथे आर्य समाजातर्फे मनपाच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी चांदुराम ...

Vaccination center started by Arya Samaj | आर्य समाजातर्फे लसीकरण केंद्र सुरू

आर्य समाजातर्फे लसीकरण केंद्र सुरू

नागपूर : जरीपटका येथे आर्य समाजातर्फे मनपाच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी चांदुराम दरबारचे संत तुलसीदास खुशालानी, पंडित अजित शर्मा व डॉ. अतीक खान यांच्या उपस्थितीत केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस दिली जात आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत तुलसीदास खुशालानी यांनी यावेळी केले. आर्य समाजाचे अध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनी खुशालानी यांचा सत्कार केला.

यावेळी राजेश लालवानी, सोनू केवलरामानी, जगदीश खुशालानी, दयाल चंदनानी, जितू केवलरामानी, किशन बालानी, तरुण रामदासानी, दिलीप हेमराजानी, त्रिलोक कटारिया, हरीश हेमराजानी, दिलीप सावलानी, सुरेश सचदेव, सुंदर बुधवानी, सुरेश कृपलानी, राजेश मनशानी, दीपक मनकनी, रूपचंद मोटवानी, हरीश चौधरी, राजेश आहुजा, सुशील चंदनानी, हरीश सेवानी आदी उपस्थित होेते.

Web Title: Vaccination center started by Arya Samaj