वेकाेलि कर्मचारी, कामगारांचे लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:31+5:302021-05-25T04:09:31+5:30
कन्हान : वेकाेलिच्या काेळसा खाणीत काम करणाऱ्या १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण ...

वेकाेलि कर्मचारी, कामगारांचे लसीकरण करा
कन्हान : वेकाेलिच्या काेळसा खाणीत काम करणाऱ्या १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण करावे, अशी मागणी काेळसा श्रमिक सभेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शासनाने ४५ वर्षावरील नागरिकांचे काेराेना लसीकरण करायला सुरुवात केली आहे. वेकाेलिच्या काेळसा खाणीत १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील अधिकारी, कर्मचारी, नियमित कामगार व कंत्राटी कामगारांची संख्या बरीच माेठी आहे. या कर्मचारी व कामगारांचा समावेश फ्रंटलाईन वर्करमध्ये नाही. मात्र, लाॅकडाऊन काळात वेकाेलिचे काम सुरू असल्याने या कर्मचारी व कामगारांचे लसीकरण करणे आवश्यक आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी काेळसा श्रमिक सभेचे केंद्रीय अध्यक्ष शिवकुमार यादव यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी या विषयावर चर्चा केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. चर्चेत माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक व उदयसिंग यादव सहभागी झाले हाेते. शिष्टमंडळात साबिर सिद्दिकी, इलियास अहमद, राकेश यादव, चंद्रभान सिंग, बलिराम यादव, बाबूजान अन्सारी, अवधेश शुक्ला, उदयभान यादव, प्रदीप यादव, चंद्रशेखर सिंग, प्रतीक नायक, सागर यादव, दुर्गेश यादव, अजय चव्हाण, आझाद कनोजिया, शुभम कनोजिया यांचा समावेश होता.
===Photopath===
240521\1952-img-20210524-wa0011.jpg
===Caption===
पालकमंत्री राऊत यांना निवेदन देताना शिवकुमार यादव सोबत माजी मंत्री राजेंद्र मुळक