नागपुरात आपली बसमध्ये बोगस पासचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 20:23 IST2018-10-30T20:22:41+5:302018-10-30T20:23:38+5:30
महापालिकेच्या ‘आपली बस’मधून प्रवास करणाऱ्या पासधारकांची संख्या मोठी आहे. यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. परंतु पासचा कालावधी संपला तरी संबंधित पासधारक प्रवास करत असल्याचा प्रकार परिवहन सभापती कार्यालयातील पथकाने मंगळवारी टाकलेल्या धाडीत उघडकीस आला. पास उपलब्ध करण्याची तसेच तिकीट तपासणीसाठी निरीक्षक नियुक्त करण्याची जबाबदारी दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी-मोडल ट्रान्झिट सिस्टीम लिमिटेड (डिम्ट्स) कंपनीवर आहे. परंतु याक डे कंपनीचे दुर्लक्ष असल्याने महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

नागपुरात आपली बसमध्ये बोगस पासचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’मधून प्रवास करणाऱ्या पासधारकांची संख्या मोठी आहे. यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. परंतु पासचा कालावधी संपला तरी संबंधित पासधारक प्रवास करत असल्याचा प्रकार परिवहन सभापती कार्यालयातील पथकाने मंगळवारी टाकलेल्या धाडीत उघडकीस आला. पास उपलब्ध करण्याची तसेच तिकीट तपासणीसाठी निरीक्षक नियुक्त करण्याची जबाबदारी दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी-मोडल ट्रान्झिट सिस्टीम लिमिटेड (डिम्ट्स) कंपनीवर आहे. परंतु याक डे कंपनीचे दुर्लक्ष असल्याने महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पासधारकांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. यावर पास दिल्याच्या तारखेची नोंद केली जाते. मात्र, कंपनीने दिलेल्या पासेसवर ती कुठल्या तारखेपर्यंत वैध आहे याची नोंद नाही. परिणामी पासची मुदत संपली की सुरू आहे, याची माहिती मशीनद्वारेच होते. पासधारकांचे वाहकाने तिकीट काढणे आवश्यक आहे. ज्या पासची मुदत संपलेली असते वा कनेक्टिव्हीटी नसते, अशा वेळी संबंधित पासचे मशीनमधून तिकीट निघत नाही. मुदत संपलेल्या पासवर विद्यार्थी व पासधारक प्रवास करीत असल्याचा प्रकार पथकाच्या निदर्शनास आला. चार जणांच्या पासेस जप्त क रण्यात आल्या. पास उपलब्ध करण्याची व तसेच तिकीट तपासणीसाठी निरीक्षक नियुक्त करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. मात्र निरीक्षकांकडून तिकीट तपासणी होत नसल्याने मुदत संपलेल्या पासचा सर्रास वापर सुरू असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना शहर बससेवेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने सवलतीच्या दरात मासिक पास योजना सुरू केली. पासेस देण्याची व्यवस्था डिम्टस् कंपनीकडे आहे. मात्र, कंपनीने शहर बसने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ दाखवून महापालिकेकडून कोट्यवधी रुपये अधिक वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास गैरप्रकार पुढे येण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या डाट्यात घोळ
परिवहन विभागाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पासेसचा मुद्दा समोर आला होता. कंपनीला याबाबत अहवाल मागितला आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. परंतु याचा डाटा कंपनीकडे उपलब्ध नाही. यात घोळ असल्याची माहिती आहे. बोगस पासचा वापर होत नसल्याचा दावा परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी केला होता. मात्र मंगळवारी पथकाने बोगस पास पकडल्याने त्यांचा दावा खोटा ठरला आहे.