शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

उलगडला संघप्रवेश ते पंतप्रधानपदापर्यंतचा 'अटल प्रवास'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:29 IST

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा विरोधकांना देखील भुरळ पाडणारी होती. नेता, कवि आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामान्य स्वयंसेवक व प्रचारक अशा विविधांगी भूमिकांतून त्यांचे कार्य जगतापुढे आहे.हाच ‘अटल प्रवास’ दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या रंगमंचावर ‘अटल यात्रा’ या हिंदी महानाट्याद्वारे मंगळवारी सादर झाला.

ठळक मुद्देअटल यात्रा : महानाट्याने केले भावविभोर३०० हून अधिक कलावंतांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा विरोधकांना देखील भुरळ पाडणारी होती. एक द्रष्टा विचारक, हिंदुत्वाची स्पष्ट परिभाषा व्यक्त करणारा नेता, कवि आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामान्य स्वयंसेवक व प्रचारक अशा विविधांगी भूमिकांतून त्यांचे कार्य जगतापुढे आहे. हाच ‘अटल प्रवास’ दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या रंगमंचावर ‘अटल यात्रा’ या हिंदी महानाट्याद्वारे मंगळवारी सादर झाला. 

दमक्षे सांस्कृतिक केंद्र व प्रयास बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने रंजना चितळे लिखित व प्रियंका ठाकूर दिग्दर्शित हे नाटक मंगळवारी सादर झाले. उद्घाटन महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, दमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, आ. अनिल सोले, नगरसेविका प्रगती पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक संजय बंगाले, नगरसेवक अजय बागडे, दमक्षेचे कार्यक्रम अधिकारी शशांक दंडे, दीपक पाटील, प्रयास संस्थेचे अध्यक्ष शक्ती ठाकूर उपस्थित होते.३०० हून अधिक कलावंतांच्या सहभागाने सादर झालेल्या या नाटकातअटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मापासून ते पंतप्रधानपदार्यंत पोहोचलेला प्रवास, अणुबॉम्बचे पोखरण येथे केलेले परीक्षण, कारगील युद्ध आदी घटना रेखाटण्यात आल्या. नाटकात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका विनोद राऊत, गोळवलकर गुरुजी यांची भूमिका अनिल पालकर, नानाजी देशमुख यांची भूमिका मुकुंद वसुले, नितीन गडकरी यांच्या भूमिका विष्णू श्रीवास्तव, दीनदयाल उपाध्याय यांची भूमिका नचिकेत म्हैसाळकर, युवा देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अंश रंधे, राजनाथ सिंह शक्ती रतन, इंदिरा गांधी हर्षाली कायलकर, लालकृष्ण अडवाणी नागेश विध्वंस यांनी साकारल्या.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNatakनाटकSouth Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र