विनाकठड्यांच्या विहिरी उठताहेत वन्यजीवांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST2021-05-13T04:08:35+5:302021-05-13T04:08:35+5:30
नागपूर : वन्यजीवांच्या रक्षणासाठी सरकार आणि वन विभागाकडून अथक प्रयत्न केले जात असले तरी जंगलालगत असलेल्या रानशिवारातील विहिरी मात्र ...

विनाकठड्यांच्या विहिरी उठताहेत वन्यजीवांच्या जीवावर
नागपूर : वन्यजीवांच्या रक्षणासाठी सरकार आणि वन विभागाकडून अथक प्रयत्न केले जात असले तरी जंगलालगत असलेल्या रानशिवारातील विहिरी मात्र वन्यजीवांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होत असले तरी या प्रयत्नांमध्ये जोम नसल्याने दरवर्षी प्राण्यांचे हकनाक मृत्यू होत आहेत. २०१९ ते चालू मे-२०२१ या काळात विहिरीत पडून ६ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद वन विभागाकडे आहे. बुधवारी सकाळी भंडारा जिल्ह्यात उघडकीस असलेल्या दोन वाघांच्या बछड्यांच्या मृत्यूमुळे या घटनेतील गांभीर्य अधिकच वाढले आहे. अशा विहिरींच्या बंदोबस्तासाठी असलेले प्रयत्न केवळ कागदापुरते मर्यादित असल्याने घटना थोपविण्यात यश आलेले दिसत नाही. अनेक विहिरी जुन्या असून त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही.
...
योजना कागदावरच
कठडे नसलेल्या विहिरींच्या बंदोबस्तासाठी योजना आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून गाककऱ्यांना विहिरीवर कठडे बांधण्यासाठी पैसे देण्याची तरतूद आहे. मात्र यासाठी शेतकरी फारसे पुढे येताना दिसत नाहीत. काही ठिकाणी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत कठडे बांधण्याची तरतूद आहे. मात्र या योजना कागदावरच आहेत.
...
कोट
कठडे नसणाऱ्या विहिरींचे प्रमाण अधिक आहे. ते बांधण्यासाठी शेतकऱ्यांना वन विभाग प्रोत्साहित करीत असतो. जिल्हा परिषद योजनांमधून विहिरी देताना कठडे बांधण्यावर भर देण्यासाठी आम्ही पत्र दिले आहे.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
...
विहिरीत वाघ पडण्याच्या घटना
२०१९ - ३ वाघ
२०२० - अन्य प्राणी
२०२१ - ३ वाघ
...