शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट होणार नियमित

By admin | Updated: January 31, 2015 02:12 IST

प्रचलित कायद्यानुसार २००१ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याचे निश्चित झाले आहे. परंतु गेल्या १४ वर्षात शहरात झपाट्याने अनधिकृत ले-आऊटवर बांधकामे झाली आहेत.

नागपूर : प्रचलित कायद्यानुसार २००१ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याचे निश्चित झाले आहे. परंतु गेल्या १४ वर्षात शहरात झपाट्याने अनधिकृत ले-आऊटवर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे २०१४ पर्यंतच्या सर्व अनधिकृत ले -आऊटना एकाच वेळी योग्यपणे नियमित करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. यासाठी नागपूर सुधार प्रन्यासला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रकारे झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची जबाबदारीसुद्धा नासुप्रवर सोपविण्यात आली आहे. यासाठीही नासुप्रला तीन महिन्यांची वेळ देण्यात आली आहे. शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नासुप्रच्या मुख्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले की, अनधिकृत ले-आऊटांची संख्या शहरात झपाट्याने वाढली आहे. त्यावर पक्की घरे सुद्धा बांधण्यात आली आहेत. २०१४ पर्यंत मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले आहेत. त्यामुळे अनधिकृत ले-आऊट एकाचवेळी नियमित करण्याचा मानस नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या स्तरावर यासाठी आवश्यक असलेले नियम-कायदे केले जातील. कॅबिनेटची मंजुरीसुद्धा घेण्यात येईल. अधिकाधिक लोकांना लाभ पोहोचवणे हाच शासनाचा मुख्य उद्देश आहे. या बैठकीचा मुख्य अजेंडाही अनधिकृत ले-आऊटांना नियमित करणे आणि झोपडपट्ट्यांच्या वितरणाचा होता. ५७२-१९०० ले-आऊटमध्ये मूलभूत सुविधांचा विकास करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानंतर हे ले-आऊट महापालिकेकडे हस्तांतरित होतील.गांधीबागेत ‘पार्किंग प्लाझा’गांधीबाग उद्यानाच्या शेजारी असलेल्या पोलीस क्वॉर्टरच्या जागेवर ‘पार्किंग प्लाझा’ उभारण्यात येणार आहे. लकडगंज येथील ५ एकर जागेवर ‘पोलीस क्वॉर्टर’ तयार करण्यात येत आहे. तेथे गांधीबागेतील पोलीस क्वॉर्टरला हलविण्यात येईल. तसेच भरतनगर येथील ३४ एकर जागेवर एलआयजी व एमआयची योजनेंतर्गत घरकुल योजना तयार करण्यात येत असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी याप्रसंगी पत्रकारांना दिली.