सावनेर पालिकेत अविराेध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:14 IST2021-02-23T04:14:09+5:302021-02-23T04:14:09+5:30

बांधकाम समितीच्या सभापतिपदी वनिता घुगल यांची निवड करण्यात आली असून, सदस्यपदी प्राजक्ता वानखेडे, अरविंद ताजणे, दीपक बसवार व स्वाती ...

Unopposed selection in Savner Municipality | सावनेर पालिकेत अविराेध निवड

सावनेर पालिकेत अविराेध निवड

बांधकाम समितीच्या सभापतिपदी वनिता घुगल यांची निवड करण्यात आली असून, सदस्यपदी प्राजक्ता वानखेडे, अरविंद ताजणे, दीपक बसवार व स्वाती कामडी, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी सचिन उईके यांची निवड करण्यात आली असून, सदस्यपदी स्मिता घटे, अरविंद ताजणे, युवराज बागडे, लक्ष्मी बागडे, शिक्षण समिती सभापतिपदी तुषार उमाटे यांची तर सदस्यपदी आशिष मानकर, नलिनी नारेकर, नीलेश पटे, स्वाती कामडी यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी इंदिरा झोडापे यांनी तर सदस्यपदी प्रभा कमाले, तेजस्विनी लाड, सुषमा दिवटे, लक्ष्मी बागडे, पालिकेचे उपाध्यक्ष ॲड. अरविंद लाेधी हे स्वच्छता समितीचे पदसिद्ध् सभापती असून, या समितीच्या सदस्यपदी अरविंद ताजणे, स्मिता घटे, नलिनी नारनवरे, सुनील चापेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलकुंदे, भाजप पदाधिकारी रामराव मोवाडे, राजू घुगल, सुजित बागडे, मोहन वानखेडे, रवींद्र ठाकूर, मारोती सोमकुवर, मंदार मंगळे, विकास ठाकरे, सौरभ घटे, विकास कामडी, अनिल झोडापे, विजय लाड, दिवाकर नारेकर, रवी कमाले, मनीष खंडाते उपस्थित हाेते.

Web Title: Unopposed selection in Savner Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.