शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला १० वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:06 IST

विशेष सत्र न्यायालयाने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : हुडकेश्वर हद्दीतील संतापजनक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे.दिलीप श्रीराम लोहरे (४९) असे आरोपीचे नाव असून, तो न्यू अमरनगर येथील रहिवासी आहे. न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३७७ अंतर्गत १० वर्षे कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार आठवडे अतिरिक्त कारावास तर, पोक्सो कायद्यातील संबंधित कलमांतर्गत पाच वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन आठवडे अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली.ही घटना २४ मे २०१७ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित चिमुकला नऊ वर्षे वयाचा होता. आरोपीने पीडित चिमुकल्याला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरी नेले व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला तसेच याची माहिती कुणाला सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी दिली. घटना उघड झाल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यावरून आरोपीला २८ मे २०१७ रोजी अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. धर्मेजवार यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारच्यावतीने अ‍ॅड. विजया बालपांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी साक्षीदारांचे बयान व विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयnagpurनागपूरjailतुरुंगSexual abuseलैंगिक शोषण